माझं पाहिलं प्रवासवर्णन ११ वर्षांपूर्वी लिहिलेलं......
नाशिक - त्रंबकेश्वर - शिर्डी - शनीशिंगणापूर मिनी दौरा
पहिला दिवस ३० एप्रिल २००० रविवार
" हिंदुं व्यतिरिक्त इतरांना सक्त मनाई आहे " हा बोर्ड वाचून मंदिरात प्रवेश केला. भली मोठी, पायांना चटके देणारी रांग पाहून हैराण झालो. २-३ तास इथं घालवण अशक्य आणी अतर्क्य वाटू लागल्याने एका गजातून श्रीत्रम्बकेश्वराच दर्शन घेवून ११.५५ ला त्याचा निरोप घेतला. वाटेवरच्या द्राक्षमळ्यामुळे द्राक्षखरेदीसाठी गाडी थांबवली. १२ किलो द्राक्ष विकत घेत पंचवटीला प्रयाण झालं. दुपारी १ वाजता गोदावरी घाट गाठला. शेवाळयुक्त पाणी बघून १.२५ ला मुक्तीघाम साठी गाडी सोडली.
१.४८ ला मुक्तिधाम ला पोहचलो. सर्व देवांच्या समावेशामुळे मंदिराला मुक्तिधाम असं नाव पडल असावं.संगमरवरी दगडांच शांत आणी सुंदर मंदिरात जावून खरोखरच मुक्ती मिळाल्यासारख वाटत होतं. जेवण तिथच घ्यायचं होतं पण जेवणाचे आकाशाला भिडलेले भाव पहाता श्रीखंड व बर्फाचे गोळे खात पुन्हा निघणार तोच आर टी ओ आडवा आला, त्याला 'चहापाणी' दिल्यावर २.४० ला तिथून निघालो. पळसे व मोहदरी घाट मागे टाकला व हॉटेलचा शोध सुरु झाला.३.२० ला एका हॉटेलात मशरूम मसाला व कोल्हापुरी वेज सोबत पुऱ्या व रोट्यावर ताव मारला. ४.१५ ला शिर्डीच्या दिशेने गाडी सोडली. ५.१० ला डीझेल भरल व दहा मिनिटात शिर्डी गाठलं. खोलीचा शोध सुरु झाला. देवळाच्या बाहेरच एका हॉटेलात खोली बुक झाली आणी ६.४५ ला खोलीत सामान विसावलं. एक खोली, २ माणसांचा बिछाना, एक टेलिकॉम, आरसा कोपरयातली टिपोयवरची ७-८ गाद्यांची चळत, बेसिन व बाथरूम असा प्रकार होता.थोडं ताजेतवाणे झाल्यावर साईदर्शनासाठी निघालो.
७.४० वा पहिल्या मजल्यावर रांगेला सुरुवात झाली. आरतीसाठी मध्येच प्रवेश बंद झाला. दीड तासांच्या रांगेतल्या येराझाऱ्यानंतर ९.१० ला साईबाबांचं दर्शन झालं. गाभाऱ्यात अगदी थंडगार वाटत होतं. बाहेरच्या मशीनवर नारळ फोडला व प्रसादाच्या जेवणाचे वेध लागले. पायपीट केल्याने पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे ड्रायव्हरला न घेताच ९.३५ ला जेवण्याच्या रांगेतून येराझाऱ्या सुरु झाल्या. राजनदादाने जेवणाची कुपन घेईपर्यंत आम्ही खूप पुढे गेलो होतो.त्यामुळे राजनदादा आणी पप्पांना येराझाऱ्या बायपास करून यावं लागलं. १० वाजे पर्यंत जेवण संपलं व त्यानंतर दिलीपभावोजी ड्रायव्हरला जेवायला घेवून गेले, आम्हा सर्वांचा जेवणाचा खर्च ४० रु व ड्रायव्हरचा एकट्याचा ९० रु झाला. असो, रात्री ११.१५ ला दिवे मालवले.
दूसरा दिवस १ मे २००० सोमवार
रात्रभर डासांमुळे नीट झोप आली नाही पण पहाटेला लागली. ७.२५ ला जागा झालो. ८.३० ला आंघोळ करून स्यांडविचेस चा नाश्ता झाला. ९.३० ला घरातून प्रयाण झालं. प्रथम उदी घेतली. मुख दर्शन, गणेश, शनिदेव, महादेवदर्शना नंतर गुरुदर्शन ( लिंबाच झाड ), रखमाई मंदिर, समाधी स्थळ, चावडी करून ११.३० ला प्रसादाच्या जेवणासाठी रांग लावली. यावेळेला ड्रायव्हरला सोबत नेलं होतं. साईबाबांच्या ह्या गावात एकदम प्रसन्न वाटत होतं.
१२.०५ ला खोलीवर बांधाबांध करून १२.३० ला खोली आणी शिर्डी सोडली. राहुरी, उंबरे गाव, व नेवासे मागे टाकत अहमदनगरत प्रवेश झाला. मध्यंतरी गाडीच्या सायलेन्सरमध्ये खराबी झाली होती.तो थोडा त्रास देवू लागला होता, सोनमुळा इथे वेल्डिंग करून घेत २.५५ ला शनीशिंगणापूर गाठलं.
फक्त पुरुषांनीच आंघोळ करून भगव्या कपड्यानिशी तेलाने शनीदेवाला आंघोळ घालून पूजा करायची असते. शानिश्वराचा शक्तीखडक उनात असतो. स्त्रीयांना तिथे जाण्यास बंदी आहे. देवळात २-३ संताच्या व देवांच्या मूर्त्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे घरांना दरवाजेच नाहीत, एक किराणा दुकान होतं त्याला सुद्धा शटर नव्हतं कारण इथे चोरी होत नाही आणी कोणी जर केली तर तो माणूस वेडा होतो भरकटतो असं त्या शनीश्वराचं महात्म्य आहे. उसाचा रस आणी बर्फाचा गोळा खावून ३.४५ ला तिथून निघालो, येताना जवळचा रस्ता धरला. साडेचारला राहुरीला परतलो. मध्ये न थांबता संगमनेरसाठी गाडी सोडली.
४.५५ ला कोल्हार, ५.०५ ला लोणी करत साडेपाचला संगमनेर मध्ये पाउल ठेवलं. ५.५० ला एका नदीपाशी चहापानासाठी गाडी थांबवली. नदी तशी मोठी नसली तरी पाणी पुष्कळ होतं. मी शुभाताईसह मुलांना घेवून नदीच्या काठावर पोहचलो. नदीच्या प्रवाहातले गूळगुळीत झालेले दगड पुन्हा पाण्यात फेकत, हात पाय धुवून ताजेतवाने होत ६.१० ला गाडी निघाली. चंदनपुरी, एकल घाट मागे टाकत ७.०० वा ' बोटा ' मागे टाकलं.
आळेफाट्यावरून ७.१० ला गाडी कल्याणच्या दिशेने निघाली. वडगाव, उंबर, पिंपळेवाडी, घनगरवाडी मागे टाकत ७.२० ला गाडीला शेवटचा घास भरवला कारण पूढे खराब रस्त्याला सुरुवात होणार होती.
एव्हाना सूर्यास्त झाला असल्यामुळे त्या काळोख्या खडबडीत रस्त्यावरून गाडी डूचमळत जात होती. थोड्यावेळाने दऱ्या लागल्या, सभोवार काळा कुट्ट काळोख, दोन्ही बाजूला डोंगर गर्द झाडी, रिकामा रस्ता पाहून मनात धस्स झालं. दूरपर्यंत प्रकाशाचा एकही किरण नाही, रस्तावर एकही वाहन नाही, अथवा बोर्ड नाही अश्या रस्त्याला संपायला एक तास लागला. ८.३० ला आमचा जीव भांड्यात पडला आणी जीवात जीव आला. दूरवर प्रकाशाचे दिवे लुकलुकताना दिसले, हा संपूर्ण ओतूर बाग ओलांडायला ८.३५ झाले. हा रस्ता संपला आणी एतिहासिक माळशेज घाटाला सुरुवात झाली. एक पिकनिक स्पॉट असलेला हा घाट कधी संपतो अस झालं होतं. अंग आखडून गेलं होतं. गाडीतल्या गाडीत हालचाल कशी करणार. त्यात पायाकडे सामानाची बोचकी आल्यामुळे परीस्थिती फार वाईट झाली.
रस्त्यावर गाड्या नसल्यामुळे कल्याणला जाताना प्रवास फार वेगात झाला. ९.५५ ला कल्याणच्या मुरबाड रोडवरून गाडी पळत होती. ब्रिज ओलांडून डोंबिवलीच्या एम. आय. डी. सी. एरियात प्रवेश केला, आता ओळखीचा रस्ता सुरु झाला. १०.३० ला गाडी गुरुकृपा समोर थांबली. आखडलेले हात पाय मोकळे झाले. तोपर्यंत टपावरच सामान पण खाली आलं. शुभाताईकडे सर्व सामान ठेवलं, मम्मी पप्पा चालत घरी गेले. मी सुद्धा पायागाडी वरून घरी परतलो.
येताना अंधारामुळे रस्त्यावरची गावे लिहू शकलो नाही. अर्थात काळोखात अंदाजाने मी जी गाव लिहिली ती माझी लिपी वाचण्याजोगी नव्हती. घरी आल्यावर जेवणाची कुणाचीही इच्छा नव्हती. गपागोष्टी व प्रवासवर्णनाच्या सविस्तर कथाकथनानंतर झोपायला साडे बारा वाजले, अंग दुखत असल्याने झोप १ वाजता आली असणार हे ओघाने आलच !
नाशिक - त्रंबकेश्वर - शिर्डी - शनीशिंगणापूर मिनी दौरा
पहिला दिवस
गजराच घड्याळ पावणेचारला ओरडलं आणी त्याने आम्हाला जागं केलं, मी सवाचारला
उठलो. पाच वाजेपर्यंत सर्व तयारी झाली. ५.३० ला गाडी आली व प्रवासाला
सुरुवात झाली. तेरा माणसे मावू शकतील अशी एक TRAX आम्ही केली होती. कल्याण स्टेशन (५.५०), काळा तलाव ( ६ .००), लाल चौकी ( ६.०६
), दुर्गाडी किल्ला (६.०७) करीत गाडीला डीझेल भरवलं. काही वेळातच
भिवंडीबायपास मेनरोडवरून उजव्या दिशेला नाशिककडे गाडी पळू लागली.
भोईरपाडा, आर्जोली, पडघा, पड्गाव, कोशिम्बी, पाली, वाशिंद, दहागाव, आसनगाव
मागे टाकत ७.०२ ला शहापूर गाठलं. कळंभे, आवरे, आरगाव, कानविंदे, उमरखाड,
घाम्नी, गोल्भान, शिरोळ, करत कसारा ७.४२ ला ओलांडल, चिंतामणवाडीनंतर
कसाऱ्यात चहा नाश्तासाठी थांबलो. ८.३६ पर्यंत बटाटवडे पोटात रिझवले. इथे
प्लानमध्ये थोडी सुधारणा झाली. त्रंबकेश्वर ,मुक्तिधाम करत संद्याकाळी
शिर्डीला पोहोचायचं ठरल.
८.४५ ला इगत पुरीच्या घाटाला सुरुवात झाली. थोड्या ट्राफिक मुळे ९.४५ ला घाट
संपला. मला घाटामुळे आणी पेट्रोलच्या वासामुळे मळमळायला होत होतं.
कसाऱ्याचे बटाटवडे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. १०.१० ला मेन रोड
वरून त्रंबकेश्वरसाठी आत वळलो आणी अचानक प्रणवचे बटाटवडे बाहेर पडले.
गाडी थांबवून ऐवोमीनच्या गोळ्या आम्हा सर्वांच्या पोटात पडल्या.निर्जन
ओसाड द्राक्ष मळे पहात १०.५५ ला त्रंबकेश्वर गाठलं." हिंदुं व्यतिरिक्त इतरांना सक्त मनाई आहे " हा बोर्ड वाचून मंदिरात प्रवेश केला. भली मोठी, पायांना चटके देणारी रांग पाहून हैराण झालो. २-३ तास इथं घालवण अशक्य आणी अतर्क्य वाटू लागल्याने एका गजातून श्रीत्रम्बकेश्वराच दर्शन घेवून ११.५५ ला त्याचा निरोप घेतला. वाटेवरच्या द्राक्षमळ्यामुळे द्राक्षखरेदीसाठी गाडी थांबवली. १२ किलो द्राक्ष विकत घेत पंचवटीला प्रयाण झालं. दुपारी १ वाजता गोदावरी घाट गाठला. शेवाळयुक्त पाणी बघून १.२५ ला मुक्तीघाम साठी गाडी सोडली.
१.४८ ला मुक्तिधाम ला पोहचलो. सर्व देवांच्या समावेशामुळे मंदिराला मुक्तिधाम असं नाव पडल असावं.संगमरवरी दगडांच शांत आणी सुंदर मंदिरात जावून खरोखरच मुक्ती मिळाल्यासारख वाटत होतं. जेवण तिथच घ्यायचं होतं पण जेवणाचे आकाशाला भिडलेले भाव पहाता श्रीखंड व बर्फाचे गोळे खात पुन्हा निघणार तोच आर टी ओ आडवा आला, त्याला 'चहापाणी' दिल्यावर २.४० ला तिथून निघालो. पळसे व मोहदरी घाट मागे टाकला व हॉटेलचा शोध सुरु झाला.३.२० ला एका हॉटेलात मशरूम मसाला व कोल्हापुरी वेज सोबत पुऱ्या व रोट्यावर ताव मारला. ४.१५ ला शिर्डीच्या दिशेने गाडी सोडली. ५.१० ला डीझेल भरल व दहा मिनिटात शिर्डी गाठलं. खोलीचा शोध सुरु झाला. देवळाच्या बाहेरच एका हॉटेलात खोली बुक झाली आणी ६.४५ ला खोलीत सामान विसावलं. एक खोली, २ माणसांचा बिछाना, एक टेलिकॉम, आरसा कोपरयातली टिपोयवरची ७-८ गाद्यांची चळत, बेसिन व बाथरूम असा प्रकार होता.थोडं ताजेतवाणे झाल्यावर साईदर्शनासाठी निघालो.
७.४० वा पहिल्या मजल्यावर रांगेला सुरुवात झाली. आरतीसाठी मध्येच प्रवेश बंद झाला. दीड तासांच्या रांगेतल्या येराझाऱ्यानंतर ९.१० ला साईबाबांचं दर्शन झालं. गाभाऱ्यात अगदी थंडगार वाटत होतं. बाहेरच्या मशीनवर नारळ फोडला व प्रसादाच्या जेवणाचे वेध लागले. पायपीट केल्याने पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे ड्रायव्हरला न घेताच ९.३५ ला जेवण्याच्या रांगेतून येराझाऱ्या सुरु झाल्या. राजनदादाने जेवणाची कुपन घेईपर्यंत आम्ही खूप पुढे गेलो होतो.त्यामुळे राजनदादा आणी पप्पांना येराझाऱ्या बायपास करून यावं लागलं. १० वाजे पर्यंत जेवण संपलं व त्यानंतर दिलीपभावोजी ड्रायव्हरला जेवायला घेवून गेले, आम्हा सर्वांचा जेवणाचा खर्च ४० रु व ड्रायव्हरचा एकट्याचा ९० रु झाला. असो, रात्री ११.१५ ला दिवे मालवले.
दूसरा दिवस