अष्टविनायक यात्रा - २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१३
शिळफाटा, खोपोली (१०.४७), देव्न्हाळी (१०.५२), परळी (११.०७), पेडली, सुधागड (११.१८), करत ११.३५ ला पालीच्या दुसऱ्या गणेश दर्शनासाठी तयार झालो. इथे मात्र अनवाणी जाण्याचा अट्टाहास सोडून निघालो. श्री बल्लाळेश्वर दर्शना आधी डाव्या बाजूला असलेलेया धुंडीविनायकाचे दर्शन प्रथम घ्यायचे असते. मंदिराच्या भटजींनी मंदिराचा इतिहास सांगितला. पालीपूरचा एक व्यापारी कल्याणशेठ आणी त्याची बायको इंदुमती, त्यांचा मुलगा बल्लाळ हा श्रीगणेशाचा भक्त होता, मित्रासह जंगलात जावून तो एका मूर्तीची पूजा करत असे, गावकऱ्यांनी त्याची तक्रार त्याचा वडिलांकडे केली. रागावलेल्या वडिलांनी जंगलात जावून बल्लाळाला मारहाण केली आणी ती गणेशमूर्ती फेकून दिली, तीच मूर्ती धुंडीविनायक म्हणून आज पुजली जाते, वडिलांनी बल्लाळाला झाडाला बांधून ठेवले, त्याने मग गणेशाचा धावा सुरु केला, गणपती तिथे अवतरले आणी त्यांनी बल्लाळाला सोडवले आणी त्याच्या इच्छेनुसार पाली इथे वास्तव्य केले. बल्लाळाच्या नावावरून हा श्रीगणेश श्रीबल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. गोष्ट संपल्यावर आरती करून लिंबू सरबत, कोकम सरबत रिचवून आम्ही निघालो.
आता पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याची वेळ झाली आणी आम्ही 'हॉटेल रेस्ट इन वन फोरेस्ट'चा आश्रय घेतला. इथे बूफे जेवण होतं - अनलिमिटेड … पापड, लोणचे, डाळ भात, चण्याची आमटी , बटाटा भाजी, गुलाबजामून, ताक असा बेत होता, दुपारी दोनच्या सुमारास पोटातले कावळे शांत झाले आणी आम्ही प्रयाण केलं ते अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीकडे… परळी (२.०७), देवन्हाळे (२.२५), एक्स्प्रेस वे (२.२७), झाल्यावर अडीच वाजता त्या भर उन्हात गाडी थांबली, पासेंजर लिस्ट येईपर्यंत आम्ही सगळे उकडले गेलो. २.५५ ला गाडी सुटली आणी थंड वाऱ्याची झुळूक मन मोहून गेली . ३.०० वाजता खालापूर टोल नाक्यावर टोल भरून निघालो रांजणगावच्या दिशेने. मध्ये मग वि. सी. आर. टोल नाका ( ४.३६) आणी तळेगाव टोल नाका ( ५.४५) पार करत शिक्रापूरहून ६.२० ला रांजणगावात प्रवेश केला. आमच्या सोबत असलेल्या 'जयंत गोगटे दांपत्या'च्या गोड मुलीने, वल्लरी तिचं नाव, कोडी घालायला सुरुवात केली. रंगीत हत्तीच कोडं मस्तच, प्रतुत्तरादाखल पंकज पण कोडी घालू लागला. ह्या कोडी 'सवाल जवाब'मुळे चांगलचं मनोरंजन झालं आणी वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रांजणगावात पोहचलो ते मावळत्या सूर्याच्या साक्षीने. ह्या मंदिराची कथा तिथे चित्रातून साकारली आहे. एका साधूच्या शिंकेतून जन्मलेल्या त्रिपुरासुराने शंकराची तपश्चर्या करून वर मागून घेतला आणी सोने, चांदी, कांस्य यांचे तीन दुर्ग मिळवले, सोबत अमरत्व पण प्राप्त केलं, मग तो देवांना, साधूंना छळू लागला, सर्व देव शंकराला शरण गेले, त्रिपुसुराला मारण्यासाठी नारदाच्या सांगण्यावरून श्रीशंकराने श्रीगणेशाची पूजा केली आणी त्रिपुरासुराचा युद्ध करून वध केला अशी आख्यायीका आहे. ह्या मंदिराची बांधणी अशी करण्यात आली आहे कि सूर्याचे किरण थेट मूर्तीवर पडतील. मूळ मूर्तीला १० सोंडे आणी २० हात असल्याचे सांगितले जाते. ह्या तिसऱ्या गणपतीचे - श्रीमहागणपतीचे दर्शन घेवून आम्ही बाहेर आलो. चहा घेत घेत गाडी बिघडल्याची बातमी कानांवर आली, तासा दीड तासासाठी गाडी दुरुस्तीसाठी गेल्याचं कळलं, 'मंगलमुर्ती टी सेंटर'मध्ये चहा, उसाचा रस, वडापाव, मिसळ पाव वगेरे खाल्यावर आणखी उशीर होणार असल्याच कळलं. जवळच्या हॉटेलात मग खिचडी आणि पुलावचं जेवण केलं, न जाणो रात्री किती वाजता पोहचू आपल्या निवास्थानी…. इथे बऱ्याच जणांच म्हणणं होतं कि गाडी दुरुस्ती, हॉटेल वर गेल्यानंतर करावी पण गाडी रस्त्यात अचानक बंद पडण्याचा धोका कसा काय घेणार …. शेवटी रात्री १ ० वाजता दुरुस्त झालेली गाडी दिसली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
ठरल्या प्रमाणे ६.३० ला दरवाज्यावर टकटक झालं, 'बेड टी' दिला गेला आणी आम्ही उठून तयारी केली. गरम पाण्यासाठी वणवण हिंडावं लागलं, खोलीत गरम पाण्याचा नळ होता पण त्याला थंडच पाणी येत होतं, हे हॉटेल बाहेरून पॉश दिसत असलं तरी आतून मात्र बोंबच होती. कुणाकुणाच्या खोलीत तर गरमच काय, थंड पाणी सुद्धा येत नव्हत, राजनदादाने म्हणे बिनपाण्याची केली …. सर्व दरवाज्यांच्या कड्या सोनीवरच्या सीआयडीच्या 'दया'ने तोडलेल्या… पंख्याचा स्पीड कंट्रोल - आउट ऑफ कंट्रोल झालेला… तिथे असणारा एक वाघासारखा दिसणारा एक पाळलेला उंच धिप्पाड 'भू भू' अवनीला मात्र जाम आवडला… ७.३० पर्यंत सगळे जमले आणी रिसेप्शनमध्ये अजून एक चहा झाला.
थेउर सोडलं आणी अंताक्षरीला सुरुवात झाली, बस मधले पुढच्या सिट्स वि. मागच्या… जबरदस्त मजा आली… कोणतेही नियम लागू नाहीत, अगदी गाणं अंतऱ्या पासून सुरु करा किंवा मुखड्यापासून, मराठी हिंदी काहीही चालेल. गोगटे,गद्रे, वैद्य आमच्या टीममध्ये असल्याने आमची टीम प्रबळ होती. मग वैद्यना पुढच्या टीम मध्ये पाठवलं. गाणी म्हणून घसा सुकला पण कुणी हार मानायला तयार नव्हतं, कुठून इतका स्टोक आला होता कुणास ठाऊक… १०.०९ ला SH - ५६, सोलापूर रोडवरून गाडी पळत होती. उरळी कांचन (१०.४८), कासुर्डी टोल नाका (१०.२८), चौफुला (१०.४८), पाट्स, गिरिम (११.२५), दौंड (११.२५), देऊळगाव (११.४०) मागे टाकून सिद्धटेकला ११.५० ला पोहचलो. पाचवा गणपती सिद्धटेक चा सिद्धीविनायक ….उजव्या सोंडेचा हा गणपती फार जागृत मानला जातो, होळकरांनी ह्या मंदिराची पायाभरणी आणी विस्तार केला. मंदिराची प्रदक्षिणा १ किमी लांबीची आहे आणी ती बाहेरून करावी लागते. अर्थात दुपारच्या रणरणत्या उन्हात पंकज आणी राजनदादा सोडून इतर कुणीही ह्या प्रदक्षिणा करायच्या फंदात पडल नाही. आमचा जेवणाचा कार्यक्रम इथे एका भटजींच्या घरात होता. पंगत बसली आणी दुपारच जेवण इथे घेतलं, चपाती, डाळ भात, मुगाची उसळ, फ्लॉवर बटाटा भाजी, गोड शिरा, ताक असा बेत होता. जेवणाच्या आधी गुरुजींनी या गणेशाची कथा सांगितली, मधु आणी कैथभ ह्या असुरांच्या नाशासाठी भगवान विष्णूने इथेच श्रीगणेशाची पूजा केली अशी आख्यायिका आहे, मोरया गोसावी यांनी इथेच गणेशाची आराधना केली होती. १.१५ ला गाडी निघाली ती मोरगावसाठी …
पुन्हा दौंड (१.४३), पाट्स (२.०५), चौफुला (२.२३), मयुरेश्वर अभयारण्य , सुपे (२.४२) करत मोरगावला २.५५ ला गाडी पोहचली. लांबून हे मंदिर त्याच्याभोवती असलेलेया चार मिनारामुळे एका मशिदीसारख दिसतं, मुघलांच्या हल्यांपासून वाचवण्यासाठी अशी अशी खास रचना करण्यात आली होती. मोरावर स्वार झालेल्या या गणेशाचं नाव पडलं मयुरेश्वर. इथे एक नंदी आहे मंदिराच्या आवारात. अस म्हणतात कि एका शिवमंदिरातून ह्या नंदीची मूर्ती हलवत असताना ती नेणारी गाडी तुटली आणी हा नंदी तिथेच राहिला, कुणाला तो हलवता येईना आणी तेंव्हा पासून तो इथेच आहे. दु ३.४८ ला उसाचा रस पिउन सगळे निघाले ते जेजुरीसाठी …खंडोबाच्या दर्शनाला…
४.०७ वा जेजुरीच्या पायथ्याशी पोहचलो, " जय भवानी, जय शिवाजी ", म्हणत त्या किल्ल्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथे डोलीची पण व्यवस्था आहे, माणशी ६०० रु त…डोली घेवून जाण्याचा रस्ता मात्र दुसरा आहे, हा रस्ता डोंगराच्या दुसऱ्या बाजूने जातो. आई खालीच थांबली, नावाला ५ - १ ० पायऱ्या चढून ती त्या पायऱ्यांवर बसली आणी आम्ही जवान लोक किल्ला सर करायला निघालो. जास्त दमछाक होवू नये म्हणून अवनीला आळीपाळीने घेण्याचं ठरलं. मी चढताना पायऱ्या मोजत होतो, ४५ व्या पायरीवर 'दमछाक'रुपी शत्रुचा सामना झाला, 'पाणी'रूपी हत्यारांनी त्याचा पराभव करून पुढे निघालो. १९० व्या पायरीवर पुन्हा हल्लाबोल झाला, थोडं 'घाम'रुपी रक्त सांडलं, पण सरशी आमचीच झाली, सोबत बरेच शिलेदार होते. लाल रंगाची 'टोपी'रुपी शिरस्त्राण घातलेले सैनिक लढताना आणी पुढे कूच करताना दिसत होते. २९० व्या पायरीवर शेवटच्या अटीतटीच्या लढाईला तोंड फुटलं आणि आम्ही शत्रुचा पराभव करत किल्ल्यावर कब्जा केला. तिथे असलेली 'काकडी'ची रसद लुटली, ३५२ पायऱ्या चढून आम्ही खंडोबाच्या दर्शनाला रांग लावली, हा पूर्ण भाग हळदीने पिवळा झाला होता. इथे भाविक लोक हळदीचा भंडारा करतात, कसेबसे कपडे डागाळण्यापासून वाचवत आम्ही गाभाऱ्यात शिरलो आणी दर्शन घेवून बाहेर आलो. सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केलेली ९ शेर वजनाची म्हणजे ४२ किलोची तलवार इथे पहायला मिळते, या तलवारीच्या कसरतीच्या आणी तलवार उचलण्याच्या स्पर्धा विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गडावर संपन्न होतात, गडाचा इतिहास इथे लिहून ठेवलेला आहे. इ. स. ८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे पुरावे मिळतात १३ व्या शतकात वीरपाल विरमल्ल यांनी हा गड बांधला, शके १५५३ मध्ये राधे बम्बाजी खटावकर, १५६८ मध्ये आप्पाजी पुवशी, १६६४ मध्ये गोविंद कुलकर्णी, श्रीगोंदेकर, १६८० मध्ये तुकोजी होळकर, श्यामजी राजपूरकर, १७६० ते १७७८ मध्ये अहिल्याबाई होळकर इ मराठा सरदारांनी मुख्य गाभारा बालदारी, दिपमाळा, गडाची तट बंदी व वेशींचे काम केले. या गडाला ९ लाख दगड वापरून एकूण ४५० पायऱ्या, १८ कमानी व ३०० दिपमाळा आहेत. 'फोटो'रूपी झेंडा रोवून आम्ही उतरण्यास सरुवात केली आणी ६ . १ ० वा गाडी निघाली प्रतीबालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां बालाजी मंदिराकडे …
नाशिकरोडवरचं चाकण १०.५३ ला मागे गेलं. तळेगाव चौक (१०.५८), मंचर (११.१९), कळंब (११.४७), नारायणगाव (११.५८), करत १२.३५ ला ओझरच्या गणरायाला भेटायला जीव आसुसला. कुकाडी नदीवरून येणाऱ्या वाऱ्याची थंड झुळूक अंगावर झेलत मंदिराच्या आवारात प्रवेश केला. चारही बाजूला उंचच उंच दगडी भिंत आहे आणी मधोमध मंदिर आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणकं आणी कपाळावर हिरा आहे. चिमाजी आप्पान्नी मंदिरावर सोन्याचा कळस चढवला आहे. श्रीगणेशाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणी शरण आलेल्या असुराला क्षमा करत " गणेशपूजा जिथे होत असेल तिथे तू जायचं नाही " अश्या अटीवर माफी दिली, ह्या असुराच्या नावावरून श्रीगणेशाला विघ्नेश्वर असं नाव प्राप्त झालं, अशी आख्यायिका आहे. कंदी पेढे इथे चांगले मिळतात असं त्या राजन आळवेन्नी सांगितल्यामुळे प्रसादाची खरेदी इथे झाली. १.३५ ला लेण्याद्रीचा डोंगर दिसू लागला.
डोंगराच्या पायाथ्याशी एका हॉटेलाशेजारी जेवण बनवण्याचं सामान उतरलं आणी आम्ही पुढे निघालो. २.१७ ला लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली . दुपारचं रणरणत ऊन त्यात समोर तीनशेसात पायऱ्या, आडोश्याला एक पण झाड नाही की कुठलीही सावली नाही, पोटात फक्त सकाळचा नाश्ता, तोंडाला पडलेली कोरड, तीव्र चढणीच्या पायऱ्या, वाटेत कुठे थांबल्यास भटक्या माकडांचा त्रास, अश्या अवस्थेत मनाचा हिय्या करून चढण्यास सुरुवात केली, दुपार असल्याने माकडे तशी नव्हती, सोबत चांगल्या ५ पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या, नाश्ता जोरदार केला होता म्हणून चढण्याच त्राण होती, उनाचा सामना करणारी 'सुयोग ट्रेवल'ची तो टोपी डोक्यावर होतीच, तासाभरात दरमजल करीत ३०७ पायऱ्या चढून त्या गुहेत शिरलो आणी पाण्याची बाटली डोक्यावर रिकामी केली. इथे म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था सुद्धा आहे. ५०० रु मोजावे लागतात मात्र…आईसाठी एक डोली ठरवली आणी तिला आधी पाठवून दिलं, एका चौकोनी 'कठहरे' मे बसवून ४ लोक खांद्यावरून उचलून नेतात आणी तेच खालीपण आणतात, पैसे मात्र खाली आल्यावरच द्यायचे. आमचा अष्टविनायकातील आठवा आणी शेवटचा गणपती … लेण्याद्रीचा गिरिजात्मक, गिरीजा म्हणजे पार्वती, आणी आत्मज म्हणजे मुलगा, हिमालयगिरीची मुलगी पार्वती, तिने आपल्याला पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्चर्या केली, आपले मन एकाग्र व्हावे म्हणून तिने एक मातीची बालमूर्ती बनवली. तिची तपश्चर्या फलद्रुप झाली आणी श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाल रुपात प्रकट झाले, म्हणून त्याला गिरिजात्मक अस नावं मिळालं, मग या गणेशाने बालासुर,व्योमासुर,शत महिशा, कमलासुर, मंजकासुर, अश्या अनेक असुरांचा नाश केला. आजूबाजूला काही बौद्ध लेणीसुद्धा आहेत. जीर्णापूर व लेखनपर्वत असेही ह्या ठिकाणाला ओळखले जाते. येथील लेण्यांना गणेशलेणी म्हणतात. ह्या लेण्यात एक बौद्ध स्तूप आहे, त्यास भीमाची गदा म्हणतात, हे स्थान लेण्यात आहे म्हणून या डोंगराला लेण्याद्री असे नाव प्राप्त झाले. संपूर्ण भारतातील गुहांमध्ये लेण्याद्री हा गुंफासमूह सर्वात मोठा आहे, इथे एकूण २०० गुहा आहेत, याची निर्मिती इ.स.पुर्व ३ रे शतक ते इ.स ३ ऱ्या शतकात झाली. गुहा नं ७ हि इथली सर्वात मोठी गुहा आहे, पुरातत्व विभागाने हा गुहा समूह राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केला आहे.
दिवस पहिला - २१ फेब्रुवारी २०१३
महड - पाली - रांजणगाव - हडपसर - पुणे.
सुनील नगर डोंबिवली इथे मुक्काम होता, मोबाईल पहाटे साडेपाचला गाऊ लागला आणि आधीच झालेली अर्धवट झोप मोडली. पटापटा आंघोळी उरकून रीक्ष्याने कस्तुरी प्लाझा गाठलं. पंकज आणी राजनदादा अजून आलेच नव्हते, लगेच त्याना फोन गेला, थोड्याच वेळात सर्व एकत्र जमले. घडाळ्यात ७.२५ झाले होते. हिरव्या रंगाची बस 'MH-४३-४७७१६' समोर येवून उभी राहिली. 'राजन आळवे' हे आमचे मार्गदर्शक होते. गावदेवी मंदिराकडे बस १० मिनिटासाठी थांबली फ्रेश होण्यासाठी. ७.४७ ला डोंबिवली सोडल आणी गाडी महडच्या रस्त्याला लागली. ८.४५ ला 'एक्स्प्रेस वे'वरून गाडी पळू लागली. ८.५१ ला खोपोली मागे गेलं. सकाळच्या थंड वाऱ्यामुळे आणी जागरणामुळे डुलकी लागली. ९.२३ ला महडच्या पहिल्या गणपतीच्या मुख्यद्वारातून गाडी आत शिरली. श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी सज्ज झालो. पादत्राणे गाडीतच ठेवून अनवाणी पायांनी देवदर्शन करावं म्हणून त्या डांबरी रस्त्यावरून पायपीट सुरु केली. गाडीचं पार्किंग बरंच दूर असल्याने आणी सवय नसल्याने पायांना खुपणं, भाजणं अनुभवलं. ह्या इथेच फक्त थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. जवळच्या तळ्यात ही मूर्ती सापडली अस म्हणतात. गाभाऱ्यातून गणरायाचं दर्शन घेवून मग मंगलेश्वर, गुरुदेवदत्त, शनी नवग्रह, करून नाश्यासाठी 'श्रीवरदविनायक धाबा' इथे सोबत आणलेला नाश्ता झाला, शेव भुरभुरून उपमा, कचोरी, तिळाचे लाडू व चहा झाल्यावर १०.३० ला " गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीरमामा कि जय "च्या गजरात गाडी निघाली ती पालीच्या दिशेने.
शिळफाटा, खोपोली (१०.४७), देव्न्हाळी (१०.५२), परळी (११.०७), पेडली, सुधागड (११.१८), करत ११.३५ ला पालीच्या दुसऱ्या गणेश दर्शनासाठी तयार झालो. इथे मात्र अनवाणी जाण्याचा अट्टाहास सोडून निघालो. श्री बल्लाळेश्वर दर्शना आधी डाव्या बाजूला असलेलेया धुंडीविनायकाचे दर्शन प्रथम घ्यायचे असते. मंदिराच्या भटजींनी मंदिराचा इतिहास सांगितला. पालीपूरचा एक व्यापारी कल्याणशेठ आणी त्याची बायको इंदुमती, त्यांचा मुलगा बल्लाळ हा श्रीगणेशाचा भक्त होता, मित्रासह जंगलात जावून तो एका मूर्तीची पूजा करत असे, गावकऱ्यांनी त्याची तक्रार त्याचा वडिलांकडे केली. रागावलेल्या वडिलांनी जंगलात जावून बल्लाळाला मारहाण केली आणी ती गणेशमूर्ती फेकून दिली, तीच मूर्ती धुंडीविनायक म्हणून आज पुजली जाते, वडिलांनी बल्लाळाला झाडाला बांधून ठेवले, त्याने मग गणेशाचा धावा सुरु केला, गणपती तिथे अवतरले आणी त्यांनी बल्लाळाला सोडवले आणी त्याच्या इच्छेनुसार पाली इथे वास्तव्य केले. बल्लाळाच्या नावावरून हा श्रीगणेश श्रीबल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. गोष्ट संपल्यावर आरती करून लिंबू सरबत, कोकम सरबत रिचवून आम्ही निघालो.
आता पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याची वेळ झाली आणी आम्ही 'हॉटेल रेस्ट इन वन फोरेस्ट'चा आश्रय घेतला. इथे बूफे जेवण होतं - अनलिमिटेड … पापड, लोणचे, डाळ भात, चण्याची आमटी , बटाटा भाजी, गुलाबजामून, ताक असा बेत होता, दुपारी दोनच्या सुमारास पोटातले कावळे शांत झाले आणी आम्ही प्रयाण केलं ते अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीकडे… परळी (२.०७), देवन्हाळे (२.२५), एक्स्प्रेस वे (२.२७), झाल्यावर अडीच वाजता त्या भर उन्हात गाडी थांबली, पासेंजर लिस्ट येईपर्यंत आम्ही सगळे उकडले गेलो. २.५५ ला गाडी सुटली आणी थंड वाऱ्याची झुळूक मन मोहून गेली . ३.०० वाजता खालापूर टोल नाक्यावर टोल भरून निघालो रांजणगावच्या दिशेने. मध्ये मग वि. सी. आर. टोल नाका ( ४.३६) आणी तळेगाव टोल नाका ( ५.४५) पार करत शिक्रापूरहून ६.२० ला रांजणगावात प्रवेश केला. आमच्या सोबत असलेल्या 'जयंत गोगटे दांपत्या'च्या गोड मुलीने, वल्लरी तिचं नाव, कोडी घालायला सुरुवात केली. रंगीत हत्तीच कोडं मस्तच, प्रतुत्तरादाखल पंकज पण कोडी घालू लागला. ह्या कोडी 'सवाल जवाब'मुळे चांगलचं मनोरंजन झालं आणी वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रांजणगावात पोहचलो ते मावळत्या सूर्याच्या साक्षीने. ह्या मंदिराची कथा तिथे चित्रातून साकारली आहे. एका साधूच्या शिंकेतून जन्मलेल्या त्रिपुरासुराने शंकराची तपश्चर्या करून वर मागून घेतला आणी सोने, चांदी, कांस्य यांचे तीन दुर्ग मिळवले, सोबत अमरत्व पण प्राप्त केलं, मग तो देवांना, साधूंना छळू लागला, सर्व देव शंकराला शरण गेले, त्रिपुसुराला मारण्यासाठी नारदाच्या सांगण्यावरून श्रीशंकराने श्रीगणेशाची पूजा केली आणी त्रिपुरासुराचा युद्ध करून वध केला अशी आख्यायीका आहे. ह्या मंदिराची बांधणी अशी करण्यात आली आहे कि सूर्याचे किरण थेट मूर्तीवर पडतील. मूळ मूर्तीला १० सोंडे आणी २० हात असल्याचे सांगितले जाते. ह्या तिसऱ्या गणपतीचे - श्रीमहागणपतीचे दर्शन घेवून आम्ही बाहेर आलो. चहा घेत घेत गाडी बिघडल्याची बातमी कानांवर आली, तासा दीड तासासाठी गाडी दुरुस्तीसाठी गेल्याचं कळलं, 'मंगलमुर्ती टी सेंटर'मध्ये चहा, उसाचा रस, वडापाव, मिसळ पाव वगेरे खाल्यावर आणखी उशीर होणार असल्याच कळलं. जवळच्या हॉटेलात मग खिचडी आणि पुलावचं जेवण केलं, न जाणो रात्री किती वाजता पोहचू आपल्या निवास्थानी…. इथे बऱ्याच जणांच म्हणणं होतं कि गाडी दुरुस्ती, हॉटेल वर गेल्यानंतर करावी पण गाडी रस्त्यात अचानक बंद पडण्याचा धोका कसा काय घेणार …. शेवटी रात्री १ ० वाजता दुरुस्त झालेली गाडी दिसली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
१०.३० ला परत टोल भरून गाडी हडपसरच्या जवळ असणाऱ्या 'हॉटेल मल्हार'ला ११.२० ला पोहचली, १०२ , २०४ व २०५ अश्या ३ खोल्या ताब्यात घेतल्या, गरम गरम भजीचा खमंग वास सुटला होता, खरं तर भूक नव्हती पण त्या वासाने भूक चाळवली आणी पाय तळ मजल्यावरच्या बुफे जेवणाकडे आपोआप वळले. श्रीखंड, चपाती, डाळ भात, पालक पनीर, भेंडी भाजी, पापड, गाजर बिट मुळा कोशिंबीर इ. हादडून झोपायला गेलो. १०२ नं च्या रूम मध्ये आई अमु , २०४ मध्ये मी ऋजुता अवनी, २०५ मध्ये पंकज राजनदादा अशी विभागणी झाली.
दिवस दुसरा - २२ फेब्रुवारी २०१३
थेऊर -सिद्धटेक - मोरगाव- जेजुरी- पुणे - हडपसर
ठरल्या प्रमाणे ६.३० ला दरवाज्यावर टकटक झालं, 'बेड टी' दिला गेला आणी आम्ही उठून तयारी केली. गरम पाण्यासाठी वणवण हिंडावं लागलं, खोलीत गरम पाण्याचा नळ होता पण त्याला थंडच पाणी येत होतं, हे हॉटेल बाहेरून पॉश दिसत असलं तरी आतून मात्र बोंबच होती. कुणाकुणाच्या खोलीत तर गरमच काय, थंड पाणी सुद्धा येत नव्हत, राजनदादाने म्हणे बिनपाण्याची केली …. सर्व दरवाज्यांच्या कड्या सोनीवरच्या सीआयडीच्या 'दया'ने तोडलेल्या… पंख्याचा स्पीड कंट्रोल - आउट ऑफ कंट्रोल झालेला… तिथे असणारा एक वाघासारखा दिसणारा एक पाळलेला उंच धिप्पाड 'भू भू' अवनीला मात्र जाम आवडला… ७.३० पर्यंत सगळे जमले आणी रिसेप्शनमध्ये अजून एक चहा झाला.
८ वाजता बरोबर " गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीरमामा कि जय "च्या गजरात गाडी निघाली. हडपसर (८.११), फुरसुंगी (८.१३), पुणे (८.१८), सासवड रोड (८.२२), कवडीपाद टोल नाका, करत ८.५० ला थेऊरला गाडी पोहचली. पेशव्यांनी या मंदिराची बांधणी केली होती आणी माधवराव पेशव्यांनी इथच प्राण त्यागले असे म्हणतात, सती गेलेल्या रमाबाईंचं स्मारकसुद्धा इथे आहे. मुंजाबा, दक्षिणमुखी मारुती, शंकराचे मंदिर अशी देवळे इथे परिसरात आहेत. दर्शनानंतर 'श्री हॉटेल' इथे सोबत आणलेला नाश्ता आणी चहा झाला. शेव घातलेले थंड पोहे, सामोसा कचोरी असा नाश्ता झाला. ९.५७ ला थेऊर सोडलं.
थेउर सोडलं आणी अंताक्षरीला सुरुवात झाली, बस मधले पुढच्या सिट्स वि. मागच्या… जबरदस्त मजा आली… कोणतेही नियम लागू नाहीत, अगदी गाणं अंतऱ्या पासून सुरु करा किंवा मुखड्यापासून, मराठी हिंदी काहीही चालेल. गोगटे,गद्रे, वैद्य आमच्या टीममध्ये असल्याने आमची टीम प्रबळ होती. मग वैद्यना पुढच्या टीम मध्ये पाठवलं. गाणी म्हणून घसा सुकला पण कुणी हार मानायला तयार नव्हतं, कुठून इतका स्टोक आला होता कुणास ठाऊक… १०.०९ ला SH - ५६, सोलापूर रोडवरून गाडी पळत होती. उरळी कांचन (१०.४८), कासुर्डी टोल नाका (१०.२८), चौफुला (१०.४८), पाट्स, गिरिम (११.२५), दौंड (११.२५), देऊळगाव (११.४०) मागे टाकून सिद्धटेकला ११.५० ला पोहचलो. पाचवा गणपती सिद्धटेक चा सिद्धीविनायक ….उजव्या सोंडेचा हा गणपती फार जागृत मानला जातो, होळकरांनी ह्या मंदिराची पायाभरणी आणी विस्तार केला. मंदिराची प्रदक्षिणा १ किमी लांबीची आहे आणी ती बाहेरून करावी लागते. अर्थात दुपारच्या रणरणत्या उन्हात पंकज आणी राजनदादा सोडून इतर कुणीही ह्या प्रदक्षिणा करायच्या फंदात पडल नाही. आमचा जेवणाचा कार्यक्रम इथे एका भटजींच्या घरात होता. पंगत बसली आणी दुपारच जेवण इथे घेतलं, चपाती, डाळ भात, मुगाची उसळ, फ्लॉवर बटाटा भाजी, गोड शिरा, ताक असा बेत होता. जेवणाच्या आधी गुरुजींनी या गणेशाची कथा सांगितली, मधु आणी कैथभ ह्या असुरांच्या नाशासाठी भगवान विष्णूने इथेच श्रीगणेशाची पूजा केली अशी आख्यायिका आहे, मोरया गोसावी यांनी इथेच गणेशाची आराधना केली होती. १.१५ ला गाडी निघाली ती मोरगावसाठी …
पुन्हा दौंड (१.४३), पाट्स (२.०५), चौफुला (२.२३), मयुरेश्वर अभयारण्य , सुपे (२.४२) करत मोरगावला २.५५ ला गाडी पोहचली. लांबून हे मंदिर त्याच्याभोवती असलेलेया चार मिनारामुळे एका मशिदीसारख दिसतं, मुघलांच्या हल्यांपासून वाचवण्यासाठी अशी अशी खास रचना करण्यात आली होती. मोरावर स्वार झालेल्या या गणेशाचं नाव पडलं मयुरेश्वर. इथे एक नंदी आहे मंदिराच्या आवारात. अस म्हणतात कि एका शिवमंदिरातून ह्या नंदीची मूर्ती हलवत असताना ती नेणारी गाडी तुटली आणी हा नंदी तिथेच राहिला, कुणाला तो हलवता येईना आणी तेंव्हा पासून तो इथेच आहे. दु ३.४८ ला उसाचा रस पिउन सगळे निघाले ते जेजुरीसाठी …खंडोबाच्या दर्शनाला…
४.०७ वा जेजुरीच्या पायथ्याशी पोहचलो, " जय भवानी, जय शिवाजी ", म्हणत त्या किल्ल्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथे डोलीची पण व्यवस्था आहे, माणशी ६०० रु त…डोली घेवून जाण्याचा रस्ता मात्र दुसरा आहे, हा रस्ता डोंगराच्या दुसऱ्या बाजूने जातो. आई खालीच थांबली, नावाला ५ - १ ० पायऱ्या चढून ती त्या पायऱ्यांवर बसली आणी आम्ही जवान लोक किल्ला सर करायला निघालो. जास्त दमछाक होवू नये म्हणून अवनीला आळीपाळीने घेण्याचं ठरलं. मी चढताना पायऱ्या मोजत होतो, ४५ व्या पायरीवर 'दमछाक'रुपी शत्रुचा सामना झाला, 'पाणी'रूपी हत्यारांनी त्याचा पराभव करून पुढे निघालो. १९० व्या पायरीवर पुन्हा हल्लाबोल झाला, थोडं 'घाम'रुपी रक्त सांडलं, पण सरशी आमचीच झाली, सोबत बरेच शिलेदार होते. लाल रंगाची 'टोपी'रुपी शिरस्त्राण घातलेले सैनिक लढताना आणी पुढे कूच करताना दिसत होते. २९० व्या पायरीवर शेवटच्या अटीतटीच्या लढाईला तोंड फुटलं आणि आम्ही शत्रुचा पराभव करत किल्ल्यावर कब्जा केला. तिथे असलेली 'काकडी'ची रसद लुटली, ३५२ पायऱ्या चढून आम्ही खंडोबाच्या दर्शनाला रांग लावली, हा पूर्ण भाग हळदीने पिवळा झाला होता. इथे भाविक लोक हळदीचा भंडारा करतात, कसेबसे कपडे डागाळण्यापासून वाचवत आम्ही गाभाऱ्यात शिरलो आणी दर्शन घेवून बाहेर आलो. सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केलेली ९ शेर वजनाची म्हणजे ४२ किलोची तलवार इथे पहायला मिळते, या तलवारीच्या कसरतीच्या आणी तलवार उचलण्याच्या स्पर्धा विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गडावर संपन्न होतात, गडाचा इतिहास इथे लिहून ठेवलेला आहे. इ. स. ८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे पुरावे मिळतात १३ व्या शतकात वीरपाल विरमल्ल यांनी हा गड बांधला, शके १५५३ मध्ये राधे बम्बाजी खटावकर, १५६८ मध्ये आप्पाजी पुवशी, १६६४ मध्ये गोविंद कुलकर्णी, श्रीगोंदेकर, १६८० मध्ये तुकोजी होळकर, श्यामजी राजपूरकर, १७६० ते १७७८ मध्ये अहिल्याबाई होळकर इ मराठा सरदारांनी मुख्य गाभारा बालदारी, दिपमाळा, गडाची तट बंदी व वेशींचे काम केले. या गडाला ९ लाख दगड वापरून एकूण ४५० पायऱ्या, १८ कमानी व ३०० दिपमाळा आहेत. 'फोटो'रूपी झेंडा रोवून आम्ही उतरण्यास सरुवात केली आणी ६ . १ ० वा गाडी निघाली प्रतीबालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां बालाजी मंदिराकडे …
६.१८ ला HP पेट्रोल पंपावर गाडीत खाद्य भरलं आणी गाडी सोडली. इथे बंद असणाऱ्या वोटर फिल्टर मधून येणाऱ्या पाण्याने बाटल्या भरून घेतल्या फक्त " पिण्याचे पाणी" ह्या बोर्डावर विश्वास ठेवून… ६.५५ ला सासवड मागे टाकून ७.३० ला बालाजी मंदिरात प्रवेश केला. इथे मोबाईल, चामड्याची पर्स, केमेरा वगेरे घेवून जाता येत नाहीत. म्हणून आम्ही ह्या गोष्टी गाडीतच ठेवून निघालो दर्शनाला… चपला स्टेन्डवर चपला जमा करून 'हेंडीक्याम' दरवाज्यावर जमा करून टोकन घेतलं. त्या भव्य मंदीराच्या सुंदरतेने डोळे दिपले, इतकं स्वछ मंदिर कि कुठे धूळ पण दिसायची नाही. गर्दी नाही कि कुठे रांग नाही, शांत स्वछ व सुंदर, पायच निघत नव्हता पण करतो काय ८ ला मंदिर बंद करतात. तेंव्हा निघावच लागलं, ८.३५ ला बस निघाली ९.४० ला पुन्हा 'हॉटेल मल्हार'वर परत आलो आणी जेवणासाठी सज्ज झालो. चपात्या, डाळ, जिरा राइस, फ्लॉवर बटाटा भाजी, वांगी भाजी, दही वडे, काकडी गाजर कोशिबीर, पापड इ. चा आस्वाद घेतल्यावर झोपण्यासाठी रूमवर आलो.
दिवस तिसरा - २३ फेब्रुवारी २०१३
पहाटे ५.३० ला दरवाज्यावर टकटक झालं आणी बेड टी मिळाला, रूम सोडायची असल्याने तयारी सोबत सामानाची बांधाबांध पण होती, कालच्या अनुभवावरून शहाणा होत गरम पाण्यासाठी पहिला नंबर लावला आणी आंघोळी उरकून ७.१५ ला सामानासकट खाली उतरलो, सामान गाडीत गेलं आणी आम्ही हॉटेलचा आणी पर्यायाने पुण्याचा निरोप घेतला. ७.३५ ला गाडी निघाली. फुरसुंगी ( ७.४९), हडपसर ( ७.५३), बंड गार्डन (८.१८), येरवडा (८.१८), संत ज्ञानेश्वर महाराज पथ (८.२०) मागे टाकून 'देवाची आळंदी'ला ८.४३ ला आलो. इंद्रायणीकाठी वसलेल्या या गावात संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. या ठिकाणी आता त्याचं मंदिर आहे. ९.३० ला दर्शन घेवून 'रमेश टी सेंटर'ला नाष्ट्यासाठी जमलो. मिसळपाव आणी भाकरवडी असा चमचमीत मेनू होता, मिसळपाव हैदराबादला मिळत नसल्याने मी त्यावर तुटून पडलो. ३ -४ प्लेट रिचवल्या असतील. पोटभर आणी मनसोक्त नाश्ता झाल्यावर १०.३० ला गाडी निघाली ती ओझरच्या दिशेने…
नाशिकरोडवरचं चाकण १०.५३ ला मागे गेलं. तळेगाव चौक (१०.५८), मंचर (११.१९), कळंब (११.४७), नारायणगाव (११.५८), करत १२.३५ ला ओझरच्या गणरायाला भेटायला जीव आसुसला. कुकाडी नदीवरून येणाऱ्या वाऱ्याची थंड झुळूक अंगावर झेलत मंदिराच्या आवारात प्रवेश केला. चारही बाजूला उंचच उंच दगडी भिंत आहे आणी मधोमध मंदिर आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणकं आणी कपाळावर हिरा आहे. चिमाजी आप्पान्नी मंदिरावर सोन्याचा कळस चढवला आहे. श्रीगणेशाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणी शरण आलेल्या असुराला क्षमा करत " गणेशपूजा जिथे होत असेल तिथे तू जायचं नाही " अश्या अटीवर माफी दिली, ह्या असुराच्या नावावरून श्रीगणेशाला विघ्नेश्वर असं नाव प्राप्त झालं, अशी आख्यायिका आहे. कंदी पेढे इथे चांगले मिळतात असं त्या राजन आळवेन्नी सांगितल्यामुळे प्रसादाची खरेदी इथे झाली. १.३५ ला लेण्याद्रीचा डोंगर दिसू लागला.
डोंगराच्या पायाथ्याशी एका हॉटेलाशेजारी जेवण बनवण्याचं सामान उतरलं आणी आम्ही पुढे निघालो. २.१७ ला लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली . दुपारचं रणरणत ऊन त्यात समोर तीनशेसात पायऱ्या, आडोश्याला एक पण झाड नाही की कुठलीही सावली नाही, पोटात फक्त सकाळचा नाश्ता, तोंडाला पडलेली कोरड, तीव्र चढणीच्या पायऱ्या, वाटेत कुठे थांबल्यास भटक्या माकडांचा त्रास, अश्या अवस्थेत मनाचा हिय्या करून चढण्यास सुरुवात केली, दुपार असल्याने माकडे तशी नव्हती, सोबत चांगल्या ५ पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या, नाश्ता जोरदार केला होता म्हणून चढण्याच त्राण होती, उनाचा सामना करणारी 'सुयोग ट्रेवल'ची तो टोपी डोक्यावर होतीच, तासाभरात दरमजल करीत ३०७ पायऱ्या चढून त्या गुहेत शिरलो आणी पाण्याची बाटली डोक्यावर रिकामी केली. इथे म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था सुद्धा आहे. ५०० रु मोजावे लागतात मात्र…आईसाठी एक डोली ठरवली आणी तिला आधी पाठवून दिलं, एका चौकोनी 'कठहरे' मे बसवून ४ लोक खांद्यावरून उचलून नेतात आणी तेच खालीपण आणतात, पैसे मात्र खाली आल्यावरच द्यायचे. आमचा अष्टविनायकातील आठवा आणी शेवटचा गणपती … लेण्याद्रीचा गिरिजात्मक, गिरीजा म्हणजे पार्वती, आणी आत्मज म्हणजे मुलगा, हिमालयगिरीची मुलगी पार्वती, तिने आपल्याला पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्चर्या केली, आपले मन एकाग्र व्हावे म्हणून तिने एक मातीची बालमूर्ती बनवली. तिची तपश्चर्या फलद्रुप झाली आणी श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाल रुपात प्रकट झाले, म्हणून त्याला गिरिजात्मक अस नावं मिळालं, मग या गणेशाने बालासुर,व्योमासुर,शत महिशा, कमलासुर, मंजकासुर, अश्या अनेक असुरांचा नाश केला. आजूबाजूला काही बौद्ध लेणीसुद्धा आहेत. जीर्णापूर व लेखनपर्वत असेही ह्या ठिकाणाला ओळखले जाते. येथील लेण्यांना गणेशलेणी म्हणतात. ह्या लेण्यात एक बौद्ध स्तूप आहे, त्यास भीमाची गदा म्हणतात, हे स्थान लेण्यात आहे म्हणून या डोंगराला लेण्याद्री असे नाव प्राप्त झाले. संपूर्ण भारतातील गुहांमध्ये लेण्याद्री हा गुंफासमूह सर्वात मोठा आहे, इथे एकूण २०० गुहा आहेत, याची निर्मिती इ.स.पुर्व ३ रे शतक ते इ.स ३ ऱ्या शतकात झाली. गुहा नं ७ हि इथली सर्वात मोठी गुहा आहे, पुरातत्व विभागाने हा गुहा समूह राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केला आहे.
अष्टविनायकदर्शन पूर्ण झालं, गणपतीची आणी त्यानंतर अष्टविनायकाची आरती झाली, निघताना मन जड झालं, यात्रा संपल्याची हुरहूर लागून राहिली, पाणावलेल्या डोळ्यांनी पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. ४.०३ ला पुन्हा डोंगराच्या पायथ्याशी आलो. तिथून बस खाली होटेलाकडे आली. अनलिमिटेड बुफे जेवण पुन्हा अनुभवलं, खुल्या हवेत हिरवळीवर खुर्च्या मांडून झाडांच्या सावलीत निसर्गाच्या सानिध्यात पुरी, बटाटा भाजी, छोले, पुलाव, डाळ, गाजराचा हलवा, असं जेवण घेतलं. ५.४५ ला परतीचा प्रवास सुरु झाला. ६.२० आळेफाटा, माळशेज घाटावर चा सूर्यास्त, 'टोकावडे' ७.२०, करून 'हॉटेल प्रांजली'ला चहा झाला. ८.१५ ला मुरबाड ८.५७ ला शहाड, ९.१० ला कल्याण, ९.३५ ला टिळक चौक डोंबिवलीला गाडी आली. रीक्ष्याने सुनीलनगर गाठलं आणी अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचं समाधान घेवून शांतपणे झोपी गेलो.