शनिवार, २६ डिसेंबर, २००९

प्रयागच्या फ़ँक्टरीत जायला मिळणार म्हणून साखरेला खुप आनंद झाला. ह्याच दिवसाची ती खुप आतुरतेने वाट पाहत होती. लहान मुले साखरेला खुपच प्रिय होती आणी आता तर तिला लहान मुलांची ओढ़ लागली होती. बेळगावच्या " रेणुका शुगर"च्या कारखान्यात स्वच्छ आंघोळ करून, पांढऱ्या रंगाची साडी नेसून, गोणपाटात स्वतःला सजवून ती प्रवासाला निघाली. या कारखान्यातुन प्रवासाला निघण्याची साखरेची ही काही पहिली वेळ नव्हती, या आधी सुद्धा कधी कुणाच्या चहात, खीरित, गोड़ी निर्माण करायला तिला धडपड़ाव लागत असे. तिला पण लोकांच्या आयुष्यात गोड़ी निर्माण करायला खुप आवडत असे.अस असलं तरीपण आज प्रयागची गोष्टच काही वेगळी होती. इथ येण्यासाठी साखर नेहमी आसुसलेली असे.
तिन दिवसांच्या प्रवासांनंतर प्रयागच्या आवारात एक ट्रक आला होता. इथे असणाऱ्या हमाल लोकांनी आपल्या डोक्यांवरचे फेटे काढून,शर्टाच्या बाह्या वर सरसावत साखरेच जंगी स्वागत केलं. तिच्या बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेचा अंत झाला होता म्हणून साखर खुप खुश होती.नाचत गात हमाल लोकांच्या खान्द्यावरून ती गोडाउनकड़े निघाली. तिच्या खुशीच आणखी एक कारण होतं. तिचा जीवाभावाचा मित्र तिला इथेच भेटणार होता,तो म्हणजे " लिक्विड ग्लुकोझ ".त्याचे आणी साखरेचे प्रेमाचे किस्से जगभरात मशहूर होते. ' लिक्विड ग्लुकोझ' ला ती प्रेमाने ' एल जी' म्हणत असे. हा एल जी दिसायला खुप गोंडस होता. तशी साखरे इतकी गोड़ी त्याला नसली तरी स्वभावाने खुपच साधा होता. कधी कुणाला दुखावायचा नाही, त्याचं सर्वांबरोबर पटत असे. त्याच्या ह्याच स्वभावावर तर साखर भाळली होती. 'एल जी' ला पण साखरेच्या आगमनाची चाहुल लागली होती. ' बटर' ने ' वनस्पति तुपा'ला तसं सांगताना एल जी ने गपचूप ऐकलं होतं. तोही खुप उत्सुक होता. एका छोट्या मुंगीला त्याने बोलावलं आणी साखरेला एक चिठ्ठी पाठवली. तस प्रयागच्या आवारात खर तर मुंगीलाही शिरायला वाव नव्हता पण ह्या मुंगीला त्याने आपल्याकड़े असणाऱ्या गोड रसाची लालूच दाखवली होती. प्रयागमध्ये शिरण अवघड होतं पण तरीही त्या मुंगीने एका रात्री धाडस केलं आणी ती एका छोट्या भोकातून जीव मुठीत घेवुन आत शिरली. साखरेला चिठ्ठी वाचून इतका आनंद झाला की तिने आपल्या गळ्यातला साखरहार काढून मुंगीला बहाल केला.साखरेचा प्रिय सखा 'एल जी' तिला लवकरच भेटणार होता. सोमवारी सकाळी सहाला त्याने तिला "रियाक्टर" बागेत बोलावलं होतं. साखरेला आता त्या दिवसाची ओढ़ लागुन राहिली होती.
सोमवारची सकाळ उजाडली. साखर तयार होवून निघाली त्या रियाक्टरकड़े. बागेत शिरताच मात्र तिला 'पाणी' दिसलं. हे 'पाणी' तीथ आधीच येवून थांबलं होतं. पाण्याच तीथ येणं साखरेला अजिबात आवडल नाही.अगोदरच पाणी आणी साखरेचा छत्तीसाचा आकडा. त्यात हे पाणी एकदम धूर्त होतं. साखरेविषयी काही बाही सांगुन एल जी च्या मनात ते सारखं विष कालवत असे. गोड गोड बोलून कुणालाही वश करण्यात त्याचा हातखंडा होता. एल जी आणी पाणी प्रयागमध्ये एकत्र रहात असत. एल जी ला पाण्याचा हा स्वभाव माहीत होता,पण काय करणार त्याचा नाईलाज होता. आल्या आल्या पाण्याने साखरेवर जाळं टाकायला सुरवात केली. एल जी बद्दल कागाळी करायला सुरुवात केली. त्याने साखरेचं इतकं डोकं फिरवलं की एल जी आल्यावर साखरेने त्याच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली. वातावरण तापू लागलं. पाण्याने मात्र आता सरडयासारखा रंग बदलला. हा पाण्याचा आणखीन एक गुणधर्म होता. जशी परिस्थिति असेल तस ते वागायचं,जसं भांड असेल तसा आकार घ्यायचं. कुठल्याही रंगात रंगत असे. इकडची गोष्ट तिकडे करणे, दुसर्यांचे कान भरणे, यात त्याचा हातखंडा होता. 'एल जी'ची बाजू घेवुन त्याने साखरेला एकटं पाडलं. तपमान ८० डिग्री पर्यंत वाढलं. साखर काही हार मानायला तयार नव्हती. 'सोडियम सिट्रेट', 'फ्रूट पावडर' वगेरे मंडळींनी शांतता राखण्याचा खुप प्रयत्न केला. पण तिघेही इरेला पेटले होते. आतापर्यंत साखरेला कळून चुकलं होतं की पाणीच या कलहाला कारणीभुत आहे, तिने आपला मोर्चा आता पाण्याकड़े वळवला, 'एल जी'च्या पण आता लक्षात आलं की पाण्यानेच हे सगळ घडवून आणलं आहे. वातावरण तापत चाललं होतं. 'एल जी'ने पण साखरेची बाजू घेतली. तापमान १४३ डिग्री पर्यंत वाढलं. दोघांना एकत्र झालेलं पाहून पाणी भांबावून गेलं. पळ काढण्याशिवाय त्याच्यासमोर काही पर्याय राहिला नव्हता. पाण्याच्या निघून जाण्याने शांतता झाली. साखरेने एल जी कड़े हळूच पाहिलं आणी नजरेनेच माफ़ी मागितली. एल जी गालातल्या गालात हसला. दोघांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार होती. दोघे एकमेकांकडे बराच वेळ पाहत राहिले. मग साखरेने 'एल जी'च्या कानात तिची इच्छा सांगितली. त्यालाही ती कल्पना खुप आवडली. त्यासाठी त्यांना एल जी च्या एका मित्राची म्हणजे डॉ.'सिट्रिक अँसीड'ची मदत होणार होती. दोघे त्याच्याकड़े गेले. लहान मुलांकडे छोट्या छोट्या गोळ्यांच्या रुपात जाण्याचा विचार ऐकुन डॉ.सिट्रिक अँसीड तयार झाला. त्याला पण लहान मुले खुप आवडत. पाण्याबरोबरच्या भांडणामुळे ह्या दोघांच्या संसारात एक आंबटगोड चव निर्माण झाली होती. पण आता मात्र त्यांच्या प्रेमाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला होता. मग डॉ.'सिट्रिक अँसीड'च्या मदतीने ह्या दोघांनी अनेक छोट्या छोट्या गोळ्यांन्ना जन्म दिला. आपल्या असंख्य मुलांना पाहून, साखर आणी 'एल जी'ला खुप आनंद झाला. त्यानी मग सर्वांसाठी प्लास्टिक ल्यँमीनेटचे रंगेबिरंगी छान छान कपड़े घेतले. प्रत्येकाला हे कपड़े घालून बाजारात रवाना केलं. 'नटखट मँगो' , 'वाईल्ड बनाना', 'मँगो डीलाईट', ऑरेंज जोश', 'पाइनापल पंच' , वगेरे नावाने ' कँडीमँन ' चं साम्राज्य निर्माण केलं. या गोळ्यांच्या रुपात लहान मुलांकडे जाण्याचं साखरेच स्वप्न आता पूर्ण होणार होतं.
एका पानवाल्याच्या दुकानात लहान मुलांच्या प्रतिक्षेत किती वेळ गेला ते "कँडीमँन" नावाच्या पेपरमिंटच्या गोळीला कळलं नाही. दुरून दोन मुलं येताना पाहून ती खुश झाली. आज आपल्या आई बाबांच स्वप्न पूर्ण होणार म्हणून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या मुलांनी गोळ्यांच्या डब्यावरून एक नजर फिरवली आणी "कँडीमँन" पेपरमिंटच्या गोळीकडे बोट दाखवलं. दोन रुपये त्या दुकानदाराच्या हातावर टेकवून चार गोळ्या घेवून ती मुले शाळेकडे निघाली. त्यांच्या मुठीतली ती गोळी स्वतःला धन्य समजत होती. तोंडात शिरताच तिच्यातली साखर विरघळू लागली आणी त्या मुलांच्या तोंडावर एक प्रकारचं समाधान दिसू लागलं. ह्याच दिवसासाठी साखरेने एवढा खटाटोप केला होता. आज ती खुप खुश होती. लहान मुलांच्या जीवनात तिने गोड़ी निर्माण केली होती आणी आज तिच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं.

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

प्रिय वाचकांस, आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद, ख़ास लोकआग्रहास्तव ह्या एकांकिकेचा पुढील भाग प्रर्दशित करत आहे, हा भाग पण तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.
या कथानकातिल सर्व पात्रे काल्पनिक असून,त्यांच वास्तविक जीवनाशी अथवा जीवंत वा मृत व्यक्तीशी काही साधर्म्य आढ़ळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.
आपला सम्पादक / दिग्दर्शक.

स्थळ : पुन्हा हैदराबाद सेंट्रल, जागा : नूडल बार, वेळ : सायं सात - साडेसात.
मुख्य कलाकार : राहुल, रुजुता आणी अमेय.
सहकलाकार : वेटर १ ला, वेटर २ रा, व 'चीनी'कम.

नवोदित कलाकार : चीनीचाँव.

राहुल : त्या नूडल बार कडे पाहू नका, ओळखतिल ते.
रुजुता: २ महीने झाले आहेत,आता नाही ओखळणार. मला पनीर सिझ्लर पाहिजे.
राहुल : बर, पण त्या दुसऱ्या दरवाज्याने जावू. त्या चीनीकमला टाळूया.
रुजुता: इथून जावुया. ( तिघे दुसऱ्या दरवाज्याने आत शिरतात )
राहुल : हे कुठे आलो आपण.
रुजुता: हे काहीतरी वेगळ दिसतय.
राहुल : अग हे बोम्बे बार आहे, नूडल बार नाही.
रुजुता: चला तिथे, नूडल बार मध्ये जावू.
( एका शोर्टकट ने तिघे नूडल बार मध्ये शिरतात, इथे तिथे चोरून पाहात )
राहुल : चला त्या चीनीकमला दिसलो नाही आपण.
रुजुता: इथे बसुया, त्या कोपऱ्यात नको.
राहुल : हो हो , नाही तर पुन्हा तीच गत व्ह्यायची.
चीनीचाँव : हल्लो शर, वाट केन आय डू फोर यु.
राहुल : मेनू कार्ड प्लीज.
रुजुता: पनीर सिझ्लर...
राहुल : ते आहे का बघ त्या मेनू कार्ड मध्ये.
रुजुता: मागच्या वेळेस होतं ना. ( चीनीचाँव कडे पाहून ) डू यु हव पनीर सिझ्लर.
चीनीचाँव : यश मेम. पनीर सोया चिली,
राहुल : आणी अमु तुला रे.
अमेय : हे मिक्स वेज मशरूम सिझ्लर.
राहुल : ( चीनीचाँव कडे पाहून ) ब्रिंग वन पनीर सोया चिली स्माल, एंड मिक्स वेज मशरूम बिग.
चीनीचाँव : एनी शुप शर.
राहुल : हं चिकन मनचाव सूप .
रुजुता : अहो काय हे, शिवरात्र आहे न आज.
राहुल : ओके, वेज मनचाव सूप.
रुजुता : टू बाय थ्री.
चीनीचाँव : एनी स्टार्टर शर.
राहुल : नो नो, थैंक्स.
चीनीचाँव निघून जातो.

इथे किचन मध्ये...
वेटर १ ला : अबे सुन, उस आदमी को मैंने कही देखा है.
वेटर २ रा : मुझे भी ऐसा ही लग रहा है.
वेटर १ ला : वो दो महीने पहिले बिना पैसे दिए भाग गए थे वो दोनो तो नहीं.
वेटर २ रा : पर उस आदमी को तो फ्रेंच दाढ़ी थी.
वेटर १ ला : निकाल दी होगी.
वेटर २ रा : फिर बता क्या करे.
वेटर १ ला : ए, सुन चीनीचाँव, क्या ऑर्डर दिया उन लोगोने?
चीनीचाँव : वेज मनचाव सूप, एंड २ सिझ्लर.
वेटर २ रा : पनीर सिझ्लर ??
चीनीचाँव : या या ..
वेटर १ ला : कन्फर्म हुआ.....ये वही दोनों है. पनीर सिझ्लर मै भूल नहीं सकता.
वेटर २ रा : चलो मजा चखाते है.
वेटर १ ला : एक आयडिया है. सुन ( कानात काही सांगितल्यासारख करतो )
वेटर २ रा : वा वा, अब मजा आयेगा.
वेटर १ ला : पूरा वसूल करेंगे. छोडेंगे नहीं इस बार.
वेटर २ रा : चीनीचाँव इधर आ, कुछ बताना है तेरेको. ( चीनीचाँव ला घेवून आत जातात ).

इथे बाहेर...
रुजुता : आज पाहू किती वेळ लागतो ते.
राहुल : चल फिरून येवुया, बनवून ठेवा म्हणाव. नाहीतर फुकट खाव़ू आज पण ( जोरात हसतो )
रुजुता : ते बघा घेवुन आला तो.
राहुल : ख़रच की लगेच आणलं त्यान. ( चेहर्या वर आश्चर्याचे भाव ).
( तिघे ते वाफाळलेलं सूप पिवू लागतात ).
राहुल : छान आहे ना
रुजुता : हो... सुर्र्रर्र्रर ( जोरात आवाज करुन, अमेय सुपात सोया सोस टाकतो आणी तसाच आवाज करतो )
अर्ध सूप संपलं आहे. सुपात तरंगणारे तळलेले नूडल संपले आहेत.
राहुल : अरे हे बघ रे काय आहे यात.... ( चमच्यात सूप घेवुन सर्वांना दाखवतो. )
रुजुता : कोबी असेल तो......छे छे नाही काहीतरी वेगळच दिसतय...
(राहुल चमच्यात सुपातला एक पदार्थ घेवुन परत सर्वांना दाखवतो. )
राहुल : अग हे चिकन सारख दिसतय काहीतरी. कुठे गला तो चीनी.
( इकडे तिकडे पहात , लांब उभ्या असलेल्या चीनीचाँव ला बोलावतो )
रुजुता : इस धिस अ वेज सूप और नॉन वेज ?
चीनीचाँव : चिकन शुप शर.
राहुल : ( कपाळावर हात मारून घेत ) बट वुई आस्क फोर वेज सूप.
चीनीचाँव : नो शर, यु आश्क फोर चिकन शुप शर.
रुजुता : आता हो, आपण पिलं की हे.
राहुल : हो, तू पण पिल ना ?
रुजुता : म्हणजे मी पिलं फक्त, खाल्ल नाहीये चिकन अजुन ??
राहुल : म्हणजे काय, बुडली की शिवरात्र तुझी पण #@!#*%$.
रुजुता : व्हाट इस धिस, वुई टोल्ड यु टू ब्रिंग वेज.
चीनीचाँव : नो मेडम, शर आश्क फोर चिकन शुप. ( त्याची ध्वनीफित अडकली आहे )
राहुल : आय सजेस्टेड हर फोर चिकन, शी रिफ्यूजड एंड ओर्डरड यु फोर वेज.
चीनीचाँव : बट शर आश्क फोर चिकन शुप. ( राहुल डोकं धरून बसतो )
रुजुता : काय करुया आता?
राहुल : तुमने हमारा धर्मभ्रष्ट कर दिया %$@#@. ( चिडून )
रुजुता : त्याला हिंदी कुठे येतय.
राहुल : काय बोलू, डोकं चालत नाहीय माझ.
रुजुता : जावू द्या, आता पिल आहे तर काही करता येणार नाही.
राहुल : शिवरात्रीच काय ?
रुजुता : आपण जाणून बुजुन नाही ना केलं ते, मग चालतय.
राहुल : छे .., @#&*^%$, बंद करायला पाहिजे सालं हे होटल.
अमेय : देव कुठे म्हणतो की खाव़ू नका म्हणून.
रुजुता : तो हे पण म्हणत नाही की खा म्हणून.
राहुल : काय करुया, प्यायच..... की दुसरं मागवू?
रुजुता : पिवुया आता, दुसरं मागवून काय होणार.
राहुल : आणेल की तो.
रुजुता : नको पिवुया हेच,नाहीतर वाया जाईल.
राहुल : जाओ यार, शिझलर लेके आओ.( चीनी चाँव कड़े पाहून )
रुजुता : जावू द्या,बदला घेतला त्यांनी मागच्या वेळचा.
राहुल : हो, शेवटी करावे तसे भरावे.

मग धुर सोडणारे दोन शिझलर येतात,त्यावर तिघेही मिटक्या मारत ताव मारतात. पाठोपाठ ७२६ रु च बिल येतं. ८० रु व्याट चार्ज लावलेला असतो. तिघे खाली मान घालून स्वताची 'वाट' लावून घेवुन बाहेर पडतात, पडद्या मागुन दोन्ही वेटरांचा हसण्याचा जोर जोरात आवाज येतो. ( पडदा पडतो ).

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

पैसेंजरचा प्रवास पाच तासात

पैसेंजरचा प्रवास म्हणजे भलताच त्रासदायक हो. मी सहसा अश्या ट्रेनने कधी जायची हिम्मत करत नाही. परवा सोलापुर ते गुलबर्गा असा पैसेंजरने जायचा योग आला. 'फलकनुमा पैसेंजर' म्हणे त्या गाडीच नाव. हेदराबादला जाणारी ही गाड़ी भलतीच घाण असते, याची कल्पना अमु ने मला आधीच देवून ठेवली होती. कुठेही हात न् लावता सरळ आत जायच दरवाज्याला पण हात लावायचा नाही, भलतीच तारेवरची कसरत. टिकिट काढून चौकशी खिड़कीवरच्या त्या गोल आकाराच्या भोकातून आत डोकावलं. आजकाल खिड़की काचेची असते आणी त्यात उगाच न चालणारा माइक वगेरे घेवून दात कोरत एखाद दुसरा बसलेला असतो, ह्या जागेवर बहुदा अर्धवट मुके बहिरे लोक बसवतात अशी माझी पक्की समजूत आहे. पहिल्यांदा विचारलेला प्रश्न त्याना आधी ऐकू जात नाही आणी त्यानंतर ते तोंडातल्या तोंडात काय बड्बड्तात ते आपल्याला कधी पहिल्यांदा ऐकू येत नाही त्यामुळे त्याना एकच प्रश्न दोनदा विचारावा लागतो आणी उत्तरेही दोनदा ऐकावी लागतात. दिवसभर आपण अखंड बडबड करतो अशी ह्यांची चुकीची समजूत असते. 'फलकनुमा पैसेंजर कब आएगी' ह्या प्रश्नाला 'लेट है' एवढच उत्तर मिळाल. 'कितनी लेट है' अस आपण पुन्हा विचारायच मग 'घंटा, आधा घंटा' असे शब्द कानावर येतात. 'कितने बजे आएगी' ह्या प्रश्नावर कोम्पुटर वर बटन आपटून 'ग्यारा बजे' असे शब्द निघाले. म्हणजे गाडीची निघण्याची वेळ होती पावणे अकराची आणी हा म्हणे अकराला येते ? मग निघते कधी ? खिड़की वर पुन्हा विचारणा झाली. दस बीस मिनिट में निकलेगी. चौकशी खिड़की वर चौकशी करून काही उपयोग नसतो. ' घंटा, आधा घंटा ', 'दस बीस मिनिट ' अशी मोघम उत्तरे ऐकून आपण धन्यता मानायाची आणी त्यात जो आकडा मोठा असतो ते खर उत्तर, आणी त्या उत्तरात आणखी काही मिनिट जोडून गाडीची वाट पहायची. घडाळ्यात दहा वाजत होते. म्हटलं गाडीला तासभर अवकाश आहे तर सोलापुर फिरून यावं. रिक्श्याने रुजुता ज्या सोसायटीत आधी रहात होती तिथे पोहचलो. तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पूर्वीची जुनी माणसे भेटली.
पापभिरू माणसे आम्ही.. अकराला पाच मिनिटे अवकाश असताना पुन्हा स्टेशनवर आलो आणी गाडीची वाट पहाणं सुरु झालं. गणितात थोडी चुक झाली होती, काही मिनिटे जोडण्याऐवजी मी काही मिनिटे चुकून कमी केली होती. मला रेल्वेच गणित काय माहित. रेल्वेची अनओउंसमेंट ही आणखीन एक समस्या, रेल्वेचे हे गुण लालू पासून ममता पर्यंत ना कुणालाही बदलता आले, ना कधी येतील. सर्वात आधी ते भोंगे अश्या ठिकाणी लावतात की जेथून लोकांना काही ऐकुच जावू नये. एखाद वेळी कुहू कुहू करणारी कोकिळा दिसेल पण हे भोंगे काही दिसायचे नाहीत. नंतर त्यावरून सुरवातीला आणी शेवटी ऐकू येणारं ते टिंग टोंग सोडलं तर बाकी काही ऐकू येत नाही. कसली तरी अन्नौन्स्मेंट झाली आणी एक गाड़ी स्टेशन ला लागली. त्यावर लिहिल होतं ' बीजापुर-सोलापुर-गुलबर्गा-फलकनुमा-काचिगुडा पैसेंजर '. गाडीची अवस्था अमुने म्हटल्याप्रमाण... दरवाज्यावरच्या लोखंडी रौडला हात न लावता आत चढलो. खिडकीतुन त्या बर्थवर रुमाल वगेरे टाकले. जागा अड़वल्या. गाड़ी इथून सुटणारी असल्याने रिकामी होती. सामान जागेवर गेलं. किती वाजता गाड़ी निघेल याची वाट पहाण, एवढच करता येतं होतं. अनेक लोक येवून गाड़ी कुठे जाते याची चौकशी आमच्याकडे करत होते. गुलबर्गा - हैदराबाद सांगुन त्याना परत पाठवत होतो. बीजापुर नहीं जाती ? असे प्रश्न अनेक बाणासारखे येत होते. तेंव्हा गुल्बर्ग्याची ढाल पुढे करत होतो. मी म्हटल, की इतके लोक अस का विचारताहेत बर ? गाडीवर तर स्पष्ट लिहिलय ती कुठे जाणार ते. अमुला म्हटलं, की जरा विचारून ये तर खरं.. टी सी ला, की काय भानगड आहे ते. शेवटी कळल की गाड़ी बीजापुर पैसेंजर आहे फलकनुमा नाही. धावत पळत उतरावं लागलं. उतरताना गुल्बर्ग्याची ढाल पाठीवर ठेवली आणी खाली माना घालून प्लेटफोर्म २ कड़े निघालो. फलकनुमा २ वर येणार होती. ' गाडी कुठल्या स्टेशनावर येणार ' हा नेहमी एक मोठा प्रश्न असतो. ह्या प्रश्नाच उत्तर ब्रम्ह्देवाला काय खुद्द ती गाडी चालवन्यारयाला पण शेवटच्या क्षणापर्यंत माहित नसतं. मुंबई ला सर्व जण प्लेटफोर्म ऐवजी पुलावर उभे रहातात आणी गाडी ज्या रुलावरून येइल त्या प्लेटफोर्म वर उतरतात इथे सुदैवाने तस काही घडल नाही. घडाळ्यात बारा वाजत आलेले आणी आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. उद्यानएक्सप्रेस येवून गेली, बीजापुर पसेंजर स्टेशनावर लागलेली, नागरकोइल ची अनाउन्समेंट झालेली, आमची कुठेगायब झाली कोण जाणे. 'ती संध्याकाळची कोणार्क पण येवून जाइल तरी आपली येणार नाही', मी उगाचचरफडलो. जीने उतरताना लांबून गाड़ी येताना दिसली. पुन्हा तेच सीटवर रुमाल टाकणे, जागा अड्वणे, धक्के खात गाडीत चढ़णे हे प्रकार झाले. खिड़कीच्या जागा पटकावल्या. नागरकोइल एक्सप्रेस गेल्यावर हलेल गाड़ी - मी अंदाज लावत होतो. कुठून तरी धड धड ऐकू आली. मी म्हटल आली नागरकोइल. खिडकीतुन बाहेर बघितलं तर नुसतं इंजिन धडधड़त गेलं. आता पुन्हा धड धड ऐकू आली. म्हटलं नक्की नागरकोइल. कसल काय एक मालगाडी मुंगीच्या पावलाने चालत आली. आम्हा दिड-दमडीच्या माणसांपेक्ष्या तो करोडो रुपयांचा माल रेल्वेला जास्त प्रिय. साडे बाराची वेळ. नागरकोइल अखेर आली आणी प्रथम ती विजापुर पैसेंजर निघाली त्यानंतर कुठे आम्ही प्रवासाला लागलो. कुठे ते "ग्यारा" आणी कुठे साडे बारा. मघाशी ऐकताना आपली चुक नाही ना झाली अस उगीच वाटुन गेलं.
जोरदार येणा
ऱ्या एन्जिनाच्या शिट्टी ने कान किटले आणी काळा कुट्ट धुर नाकातोंडात गेला. आता लक्ष्यात आलंकी आम्ही बरोबर इन्जिना पासून दुसरया डब्यात होतो. ' झुक झुक झुक झुक अगिन गाडी, धुरांच्या रेषा हवेतकाढी ' गाण म्ह णावस वाटल पण त्या धुरामुळे आवाजच निघेना. इथे धुरांच्या रेषा नव्हत्या तर अनेक वलयेअसलेले मोठाले ढग होते. ह्स्तातल्या पावसाने सर्वत्र हिरवळ झाली होती. नद्या तुडुम्ब भरून वहात होत्या. शेतकरीभाताची शेती कापत होते. सूर्य ढगांच्या आत लपला होतां. मस्त वातावरण होतं, अधून मधून धुरांचे लोळ उठतहोते. गाडीत् कुठे बटाटवडे खा, कुठे मिर्ची भजी चाव आणी तिखट लागल्यावर पाणी..अस चालु होतं. खाता खाता हीगरम नाहीत अस म्हणुन पुन्हा दुसरया कडून तेच विकत घेणे अस करत प्रवास चालला होता.
टिकेकरवाड़ी पहिल ठिकाण, त्यानंतर होट्गी (१२.४०), तिलाठी (१२.५०), अक्कलकोट ( १.००), नागणसुर (१.१५ ), बोरोटी ( १.२५ ), दुधनी ( १.४० ) करत कर्नाटकात प्रवेश केला. कुलाली (१.५० ), गौड़गाव ( २.०५ ), गाणगापुर ( २.१० ), हुन्सीहडगीळ ( २.२५ ), सावळगी ( २.२० ), बबलाद ( २.४० ) करत पावणेतिनला गुलबर्गा आलं. जस कुठेही हात न लावता चढलो होतो तसच उतरलो. शिट्टी च्या आवाजाने कान जवळ पास बंद झालेले आणी धुर खावुन धाप लागलेली तरीही सुखरूप आणी फक्त २ च तास उशिरा पोहचवल्या बद्दल रेल्वेचे मनोमन आभार मानले.

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

हैदराबाद सेंट्रल, जागा : नूडल बार, वेळ : रात्रीचे आठ - साडेआठ.
मुख्य कलाकार : राहुल आणी रुजुता.
सहकलाकार : वेटर १ ला, वेटर २ रा, व 'चीनी'कम, सोबत काही पाहुणे कलाकार.
राहुल :चल आज आपण सिझलर खायच का ?
रुजुता :हो चाSलेSल. ( आवाज जरासा बोबडा, तोंडात पाणी आलेलं )
राहुल :ते बघ तिथे नूडल बार, जायच ?
रुजुता :हं चला ( आवंढा गिळून )
दोघांची पावल नूडलबार कडे वळतात , दारावर एक 'चीनी' कम स्वागत करते. मिचमिचे जपानी 'सुज'मट डोळे, उंची चार ते पाच फुट जेमतेम, दात ओठां वर बाहेर येवून आराम करत असलेले.
चीनीकम :ह्यांलो सर ,हँव मेन्नी पिपल ?
राहुल :( स्वगत - आंधळी बिंधळी आहे की काय, दिसत नाही , डोळे जास्तच मिचमिचे झाले वाटत ) वुए आर टू .
रुजुता :बापरे किती हो ही गर्दी.
चीनीकम :कम हीर शर ,शीट हीर.( एका टेबलाकडे अक्खा हात दाखवत )
अस म्हणून तिने मेनू कार्ड आणून देते. टेबलावरचे रुमाल दोघांवर टाकते.
राहुल :ह्या मेनू कार्डवर सिझलर दिसत नाहीय.
रुजुता :ह्या दुसरया मेनू कार्ड मध्ये आहे बघा. ( दुसरंच एक कार्ड फडफडवत )
राहुल :हो हो दिसल.
रुजुता :इथ थंडी वाजतेय हो खूप.
राहुल :ते ए सी च डक्ट आपल्या डोक्यावर आहे बरोब्बर, त्यामुळे वाजते थंडी
रुजुता :दूसरीकडे बसुयात का.
बाजूचे लोक पण उठून दूसरी कड़े जातात. एका कोपरयात जागा असते.
राहुल :तिथे थंडी नाही वाजत बहुतेक. ( कोपरयाकडे बोट दाखवत )
रुजुता :जावुया का तिथं.दोघेही टेबल सोडून कोपरयातल्या टेबलाकडे जातात, मेनुकार्ड सोबत घेवून.
राहुल :बोंल काय हवय तुला. ( मेनुकार्ड उघडून पाहात )
रुजुता :पनीर सिझलर, मागच्या वेळी खाल्ल होतं ना तेच. मस्त होतं.
राहुल :मी तर बुवा नॉन वेज खाणार ( चिडवून दाखवत )
रुजुता :वेटरला बोलवा ना भूक लागली. ( पोटा वरून उगाच हात फिरवत )
मग वेटरला बोलावण जातं, त्यांची नुसती धावपळ चालली आहे, त्यांच लक्ष्यच नाही आहे. शेवटी एकाला पकडून ऑर्डर दिली जाते. अर्धा तास झाला आहे पण जेवणाचा अजुन पत्ता नाही .आता तर बाजूच टेबल पण चिडलं आहे. त्याना पण येवून ४५ मिनिटे झालेली असतात.
टेबलावरची बाई : वुई गेव ऑर्डर इन् फाइव मिनिट एंड वेटिंग फॉर फोर्टी फाइव मिनिट, इफ यु डिड नोट ब्रिंग इन् फाइव मिनिट, वि विल लिव
वेटर २ रा : आय विल चेक, मैम.
टेबलावरचा माणूस :टेल मी इज इट रेडी और नॉट SS ? ( आवाजात एक प्रकारची चिड असते, डोळे लाल झालेले असतात )
वेटर १ ला : रेडी सर ( घाबरत )
तो लगेच जावून जेवण आणतो. टेबल समाधानाने जिंकल्याच्या आविर्भावात जेवण वाढून घेतं.
राहुल :छे बाबा, *@#// काय चाललय ह्यांच, किती वेळ ( टेबलावर असणार्या कागदावर पेंसिलिने रेघोट्या ओढत )
रुजुता :कंटाला आला बाई ( लांबलचक जांभई देत )
राहुल :आपण ज्या टेबलावर बसलो होतो ना तीथे नविन बसलेल्यांच जेवून पण झालं
रुजुता :अरे हो ख़रच की
राहुल :ते इथे कोपरयात लक्ष्यच देत नाहित, हेलो ,कितना टायम लगेगा यार ( वेटरच बखोट पकडून )
वेटर १ ला :सर बस दो मिनिट
रुजुता :त्याच्यासारख ओरडायला पाहीजे ( बाजुच्या टेबलाकडे डोळे करुन )
बाजुच्या टेबलावरच जेवण सम्पत आलं आहे .
राहुल :थांब त्याला बोलावतो, क्या चल रहा है ,हम जाए क्या ( वेटर कड़े रागाने पहात )
वेटर २ रा :सर हो गया.
तो आत जातो आणी नॉन वेज सिझलर आणतो .
रुजुता :शी बाबा ...
राहुल :घे तू टेस्ट कर थोडं.
रुजुता :त्याने दोन्ही एकदम आणायला पाहीजे होतं ना.
राहुल :येइल तुझ पण, थांब ना जरा.
रुजुता :मि काय तुमच्या तोंडाकडे पहात राहू.
राहुल :नूडल खा तो पर्यंत तू, मी आपला फोडी खातो ( उजव्या हाताचा अंगठा वर करून ).
रुजुता :बर ( स्वगत - पनीर येवू दे मग बघा )
नॉन वेज सिझलर आता संपत आलं आहे . इतकी भूक लागली आहे की ते तळच कोबिच करपट पान पण खावुन टाकलं आहे. तरी वेज सिझलरचा पत्ता नाही.
राहुल :अबे क्या हुआ कब आयेगा तुम्हारा ऑर्डर ( येराझारया घालत )
वेटर १ ला :सर अभीतक नही दिया आपको ?
राहुल :क्या यार मतलब, मजाक चल रहा है क्या ?
रुजुता :आता अजुन किती वेळ लागणार काय माहीत.
अजुन १० मिनिटे वाया जातात एकमेकांच्या तोंडाकडे पाहात.
राहुल :चल जावुया तुझ्या नशिबात पनीर नाही बहुतेक ( चेहर्यावर एक खट्याळ स्मितहास्य, राग लपवण्याचा प्रयत्न )
आता वेटर २ रा आला आहे. राहुल त्याच्या कड़े रागाने पहातो तो कपळावर हात मारून घेतल्या सारख करतो आणी आत पळतो
रुजुता :केंसल करुया का ऑर्डर
राहुल :चल असच जावुया, पैसे त्या बाकी लोकान कडून घ्या म्हणावं .
रुजुता : चला
दोघे सरळ उठतात आणी बाहेर येतात. चीनीकम बाहेर उभी आहे
चीनीकम :गुड नैट सर
तिच्याकडे न पहाताच दोघे सरळ लिफ्ट मध्ये शिरले आणी ५ वा मजला गाठला .

इथे आत
वेटर १ ला :(हातात सिझलर घेवून ) ये दोनों कंहा गये ?
वेटर २ रा :टॉयलेट तो नही गए ?
वेटर १ ला :दोनों एक साथ ??
वेटर २ रा :रख देना टेबल पे, आके खा लेंगे
वेटर १ ला :कही भाग तो नाही गए ?
वेटर २ रा :@#!~? अबे धुंड उनको, पैसे नही दिये है .
वेटर १ ला :वो चीनीकम को पूछ जरा.
वेटर २ रा :ओ चीनी कम ,वो फ्रेंचकट वाला आदमी बाहर गया क्या ?
चीनीकम :या गोन (नाकात)
वेटर १ ला :मारे गए, अभी क्या करे.
वेटर २ रा :मैं बाहर देखता हु, चालु लोग #!!*@%
वेटर १ ला :इसका अब क्या करे ( थंड झालेल्या सिझलरकडे पाहात)
वेटर २ रा :मेरे सर पे डाल दे ( स्वताच्या डोक्यावर हात ठेवून )
आणी ते धुर सोडणार सिझलर थंडलर बनुन जातं. दोन्ही वेटर कपाळाला हात लावून मटकन खाली बसतात (अंधार होतो, पडदा पडतो )