मंगळवार, ७ जुलै, २००९

माझा पहिला वहिला विमान प्रवास

माझा पहिला वहिला विमान प्रवास....
पंकजकडे हैदराबादला जायच होत. त्याने विमानाच टिकिट काढल होत. हैदराबादला मासे मिळत नाहीत म्हणून मुंबईचे मासे तिथे नेवून खावेत अस ठरल होत. त्याची खरेदी झाली आणी ' मोहरी आणी पापलेट 'हे नवे पाहुणे आमच्याबरोबर विमान प्रवासाला तयार झाले. विमानात बसण्याचा योग आहे अस म्हटल्यावर ज़रा खिश्याला कापूनच आले .आल्या आल्या त्यांची चांगलीच सरबराइ झाली . मी मम्मी पप्पा आणी मावशी असे आम्ही ४ जण निघालो होतो. मुंबई म्हटली की गर्दी ही आलीच. गर्दीतून लटकत आम्ही घाटकोपर गाठल. टेक्सीला साद घातली आणी ' डोमेस्टिक एयरपोर्ट हं, नही तो इन्टरर्नशनल ले चलेगा ', अस त्या मकट टेक्सीवाल्याला जरा रुबाबात सांगितल. अर्थात विमानतळावर जाणारे म्हणजे आयतेच चालून आलेले बकरे अशी त्याची समजूत असल्याने माझा हां रुबाब मला १६० रुला पडला. बाहेरच उभ्या असणार्या ट्रोलीवर आमच सामान चढ़ल आणी मोठ्या मुश्कीलीने ट्रोली ढकलत आम्ही विमानतळात शिरलो . मला नंतर कल की त्या ट्रोलीच्या वर एक फ्लेपर असतो आणी तो दाबल्या शिवाय त्या ट्रोलीचा ब्रेक्क सुटत नाही. मी ब्रेक लावलेल्या स्थितीत ती ट्रोली महत्प्रयासाने ढकलत होतो. नवखेपणाचा पहिला फटका. तिथल्या काही लोकांनी ' काय गावठी आहे हा ' अश्या काहीशा नजरेने पाहिल. तो फ्लेपर दाबुन गाडी रुळावर आली. मी चेक इन च्या काउंटर वर उभा राहिलो, तिथे असणारयानी मला सामान स्कैनिंग करणारयांच्याकडे पाठवल. पुन्हा त्याच नजरा.. सामाना बरोबर हँड्स ब्यागा पण तिथे ठेवल्या, ते मशीन फक्त मोठ्या ब्यागा खातं हे तेंव्हा कल. मागे उभ्या असणार्यानी पुन्हा तेच लुक दिल.... टिकिट काउंटर वर सुन्दर मुली का बसवतात... " विंडो सिट हवी, मधली नको " ही इंग्लिश मध्ये घोकून पाठ केलेली वाक्यं विसरलो आणी एकाच विंडो सिट आणी बाकीच्या मागच्या मधल्या जागा.. गळ्यात पडल्या.
पुढे आणखी सिक्युरिटी चेक, इथ तरी त्या नजरा नको अस ठरवून सुद्धा आमच्या कडच्या पिशव्यांवर ते कसलेसे टैग लावायचे राहून गेले, अश्या नवख्यांची त्याना सवय असल्याने त्यांनी आम्हाला टैग दिले आणी आमच्या सामानावर बांधून आमच्यावर उपकार केले.
बोइंग ९ डब्ल्यू ४५१ नं च हैदराबाद ला जाणार विमान स्टेशन वर लागल्याची घोषणा झाली. आमच टिकिट पुन्हा चेक झाल आणी आम्ही एका बस समोर उभे राहिलो. पैसे भरलेत ना भरपूर मग स्टेंडिंग जायच कशाला ? बस सोडली, पुढची बस पुढ्यात येवून उभी राहिली, रेल्वेत जागा पकडतात तश्या घाइ घाइने जागा पकडल्या. त्या गाडीत जेमतेम ५ - ६ च जागा होत्या आणी आम्हाला जागा मिळाल्याने धन्यता वाटली. मागे उभे असणार्यानी पुन्हा तेच लुक दिल. ५ मिनिटात विमान दृष्टीपथात अल आणी बसचा दरवाजा खाडकन उघडला गेला.आम्ही विमानाकडे पोहचलो, त्या नील आर्मस्ट्रोंगला चंद्रावर पहिलं पाउल ठेवताना जस वाटल असेल तस मला वाटल. २० ए ,बी, सी, डी मी जागा शोधल्या. सिट बेल्ट हा आणखिन एक त्रासदायक प्रकार, एका बाजुच्या पट्ट्यामध्ये दूसरी बाजू घुसवली , जिथून म्हणुन घुसवता येइल तिथून, ती आत ढकलली तरी ती अडकेचना, मग मी मागुन पुढून खुप प्रयत्न केला पण काही केल्या ती अडकेना. शेवटी खुट झाला आणी मी बांधला गेलो. आता बांधल तर खर पण उघडायच कस ? चक्रवृहात अडकलेल्या अभिमन्युच्या वेदना अनुभवल्या. त्या फ्लेपरला फटकावल तर त्याचा वरचा फ्लापर वर आला आणी मी चक्रव्यूह भेद्ला. गाडी म्हणजे विमान हलल. आमच्या बाजुच्या विंडो सिट वर कुणीही नव्हता आणी गाड़ी सुटली तेंव्हा कुणी येणार नाही अस म्हणत मी ती सिट पटकावली, पप्पान्नी मग मागची एक विंडो सिट पटकावली. लोकांच्या नजराना भिक न घालता आम्ही पहिल्या विमान उड्डाणाला तयार झालो.
विमान हवाइ पट्टी वर येवून थांबल. कानात कापसाचे बोळे गेले, हवाइसुन्दरींच्या हातातून पेपरमीन्ट च्या गोळ्या घेतल्या. पुन्हा खर खर सुरु झाली आणी विमानाने वेग घेतला, काही सेकंदात वेग भरमसाट वाढला आणी आम्ही जमिन सोडली. काही क्षणात ' अरेबियन नाइट 'च्या अलिफ़ लैलात शहर, माणसं जशी लहान होतात तशी ही मुम्बापूरी लहान झाली. मोठाल्या बिल्डिंगी गाड्या क्षणात पायाने चिरडून टाकाव्या इतक्या लहान झाल्या. थोड्याच वेळात मुंग्या मोठ्या वाटाव्या इतक्या लहान झाल्या. अप्रतिम, सुंदर, काय तो देखावा डोळ्यात मावेचना तो मुंबई चा गोलाकार आकार, अगदी नकाशा पाहिल्याप्रमाने दिसू लागला. विमानाने तीव्र वण घेतल आणी ते समुद्रावर आल. समुद्र चमचाभर पाण्यासारखा दिसू लागला, कुणीतरी रांगोळी काढावी तसे ते रस्ते झाडे झुड्पे, आणी डोंगर दिसू लागले, विमानाची उंची सातत्याने वाढत होती. थोड्याच वेळात आम्ही ढगांच्याही वर आलो होतो. ढगांच्या मधून ती सुंदर रांगोळी पहात होतो.
ते इंट्राफ्लाएट इंस्ट्रक्शन सुरु झाल होत. सिट बेल्ट, फुगवणारी पिशवी वगेरे, समजावून हातवारे करत सांगत होते. पेट पूजेसाठी काहीतरी आणल जात होत. वेज की नॉन वेज अशी विचारणा झाली, मी नॉन वेज मागवल. चिकन स्यांडविच, रसमलाई, आणी इटूकल्या पिटूकल्या बेचव इडल्या पदरात पडल्या. कोफिचे तर तिन तेरा वाजलेले. कोफी वेगळी, दूधपावडर वेगळी,आणी साखर वेगळी.सगळ एकत्र करायच आणी कोफी पिल्याच समाधान मानायच.
थोड्याच वेळात आपण हैदराबादला उतरणार अशी अनोउंसमेंट झाली, विमानाचे पंख वर उचलले गेले आणी उंची कमी होवू लागली. खालचे ढग जवळ येवू लागले आणी विमाना भोवती धुक जमा होवू लागल. ढगातुन खाली उतरल्यावर पुन्हा ती रांगोळी नयन सुख देवू लागली, अलिफ़ लैलातल्या जिन प्रमाणे खलील वस्त्या मोठ्या होवू लागल्या. ढगातुन गळून येणारया किरणामुळे तो देखावा अतिशय सुन्दर दिसत होता. पुन्हा ते तीव्र वळण घेतल गेल आणी चारही बाजूने ती रांगोळी पहायला मिळाली. वेग आणी उंची झपाट्याने कमी होत होती बिल्डिंगी, रस्ते, मोटार गाड्या मोठ्या होवू लागल्या, मुंग्यांची माणसं झाली आणी धाव पट्टी वर विमान आल, अचानक एक धक्का बसला आणी विमानाचा आणी जमिनीचा तब्बल तासाभराने संगम झाला. धाव पट्टी वर विमान पत होत. ब्रेक लागले आणी गाड़ी प्लेटफॉर्म ला लागली. ' हैदराबाद ला तुमचे स्वागत , जेट एअर वेज ने प्रवास केल्याबद्दल धन्यवाद " हे वाक्य हवेत शिरताच विमान थांबल आणी सर्व लोक सामान घेवून पटापट बाहेर पडू लागले. आम्ही पण बाहेर पडलो, विमानातल स्वछता गृह आपण पाहिलच नाही.... रुख रुख लागुन राहिली, मग विमानतळावर उतरून ती रुख रुख ' ओली ' केली. एका मोठ्या बेल्ट वरून आमच्या ब्यागा बाहेर आल्या, ट्रोली इथही होती पण त्याला तो फ्लेपर नव्हता, मी तो फ्लेपर शोधत होतो, थोडक्यात ही गाडीच गावठी होती बिना ब्रेक ची..., शेवटी मीच पूर्ण हैदराबाद कड़े तो गावठी पणाचा कटाक्ष टाकुन माझ्यावर मुंबईत झालेल्या प्रकाराचा वचपा काढला.....


राहुल तिवे

त्रिलोकी एक अजब समीकरण

त्रिलोकी नाथ पंत.
हैदराबादची अनोळखी जागा, नविन कंपनी आणी नविन माणसे, कुणालाही ओळखत नाही, अश्या ठिकाणी ४ महीने एका छोट्याश्या मी खोलीत एकट्याने कसे काढले याच अजुन ही आश्चर्य वाटत आल आहे मला. कंपनीत मोठी घडामोड होणार होती. बऱ्याच जणांची ट्रान्सफर झाली होती आणी त्रिलोकी चा रूम पार्टनर अहमदाबाद ला चालला होता. त्यामुले मी तब्बल ४ महिन्यानी माणसात आलो होतो आणी त्रिलोकी सोबत रहायला बी इन आर अपार्टमेन्ट मध्ये शिफ्ट झालो होतो. त्रिलोकी नाथ पन्त, एक अजब समीकरण, सहा फूटाची उंच शरीरयष्टि, वजन जेमतेम पन्नास पर्यंत असाव. लांबुन पहाताना कपड्यांच्या आत कदाचित देह असावा असा वाटे पर्यंतच. बोलण्यात कुणालाही हार जाइल तर शप्पथ. वागण मात्र बरोबर उलट, बोले तैसा चाले त्याची वन्दावी पाऊले, च्या कल्पनांना छेद देणारा. त्याच्या साठी काही नवीन म्हण तयार करावी लागेल, बोले तैसे चाले त्याला त्रिलोकी कैसे म्हणावे.
" मुझे तो साफ़ साफाई बहोत पसंद है " म्हणेल आणी दिवसेंदिवस आंघोळ करणार नाही. " शुद्ध शाकाहारी खाना ही जीवन की गुरु किल्ली ", हे वाक्य हवेत विरताच चिकन घरात हजर होइल. " चलो यार, आज घुमने चलते है " अस म्हटल की समजाव की आज आराम करण्याचा मुड़ आहे. मी तर शेवटी त्याच्या बोलण्याचा उलट अर्थ लावून घेण्याची सवयच लावून घेतली होती. तो म्हणेल तस दुसरयाने कराव त्याने नाही. मी चिकन आणल की म्हणे " घर में ऐसे चिकन बनाना ठीक नहीं, पता है मेरे सपने में कल गंगा नदी आई थी, क्या भयंकर बाढ़ आई थी उसे, नाराज थी मुझपर ". " नहीं खाना है तो तू मत खा ", मी म्हटल. पुढच्याच दोन दिवसांनी तोच स्वत चिकन घेवून आला. मी त्याला म्हटल " अब गंगा नदी शांत है क्या, बाढ़ खत्म हो गयी लगता है, ज्यादा नुक्सान नहीं हुआ ना ". मला शांत बसवतय.
जेवण बनवण्यात हातखंडा, पण साहित्य मात्र राजे शाही हव बर का. गोडे तेल, ६० रु वालं छे, अजिबात नाही, " कभी शेर को घास खाते देखा है ? " अस म्हणुन मला चुप करणार. 'अमूल'च्या साजुक तुपात जेवण बनवणार, तांदुळ हवे तर ते बासमती, दिल्ली राईसच पाहिजे बाबा.काय म्हणता नुसती तुरीची डाळ... नाहीबा, उडीद, चणाडाळ, मुग, तुरडाळ, मसूर ह्या पंच डाळीची चिकट आमटी रोज पचवावी लागे. तुप, क्रीम, काजू बेदाणे, मी म्हणे असे भारी जिन्नस घेवून कसही जेवण बनवल तरी ते छानच लागणार त्यात विशेष काय ते.
जेवण बनवायची पद्धत एकदम भारी, माझी स्वयंपाक घरातली लुडबुड अजिबात खपणार नाही, मदत तर दूर राहिली, अर्थात माझ्या ते पथ्यावरच पडायच. मला आराम मिळायचा. समजा रात्री ९ ला जेवायाच आहे तर हे महाशय साडे आठ पर्यंत काही करणार नाही. मग अचानक अंगात वारं शिरल्यागत तडक कामाला लागणार. आधी डाळ बनवायची आणी मग भाताचा कुकर लावायचा. तुपाची फोडणी, कांदा टोमेटो हातानेच हातावरच कापून तुपात तडतडवणार, हे करताना म्हणणार " प्याज तो एक जैसा काटना चाहिए ", मी ह्याचा अर्थ नेहमी प्रमाणे उलट घेतो. हळद, मिर्चीपुड, मसाले, मीठ, वगेरे घालून कुकर लावला की त्याला आठवणार की कपडे धुवायचे आहेत पण हे काम काय आत्ताच करायला हवे ? कपडे धुण्याचा आवाज रात्रीच्या काळोखात घुमला आणी जोडीला कुकर ने ५ वेळा बोलावल की साबण्या हाताने शिट्टी ओढून काढणार, थोडा डाळीचा नेवेद्य भिंतीना वगेरे देणार, डाळ दुसऱ्या भांड्यात काढून त्याच कुकरमद्ये तांदुळ, अंदाजे, घेवून, धुवून त्यात ४ बोटं बुडवून पाणी घालणार. कुकर गैस वर आणी त्याखाली गैस चा नोब अगदी बाहेर येइपर्यंत फिरवून, त्याचा वणवा करणार. हे करुन पळणार बाथरूम मध्ये आंघोळीला. मोठ्याने " हर गंगे, भागीरथी ..." म्हणत अख्खा माळा गाजवणार. ५ मिनिटात कावळ्याची आंघोळ करून, 'भाताने मी शिजलो बर का' अस ३ शिट्ट्या मारून सांगितल की ओल्या हाताने कुकर ची वाफ काढून भाताची सुटका करणार. मग पुढच्या ५ मिनिटात देवाची पूजा... रोज त्याची ही अशी, कोंबडी कशी मागे कुणी लागल्यावर पंख फडफडवत गाव भर नाचते तशी, कसरत पाहून आम्ही जेवायला बसायचो. अर्थात नऊ चे सव्वा नऊ व्हायचे आणी जेवण पोटात जायच.
काही असल तरी माझ्या कठिन, खडतर पहिल्या ४ महिन्याच्या त्रासातून सुटका करणार्या ह्या त्रिलोकीला मी कधीही विसरु शकणार नाही. माझ त्या काळात कमी झालेल वजन वाढवण्यात त्याच्या हातच्या तुपातल्या डाळीचा मोलाचा वाटा होता....

सोमवार, ६ जुलै, २००९

रामोजी फिल्म सिटी

तारीख २२ जून २००९
रामोजी फिल्म सिटी ... तसा मी बऱ्याच वेळा जावून आल्यामुळे आज पुन्हा तीथ जाण्यात नाविन्य नव्हत. आई , अमु ला पहायच असल्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी आज पुन्हा जायच ठरवल. रुजुताने काल इंटरनेट वरुन माहिती काढली होती आणी कुणा एका सागर नावाच्या ट्रेव्हल वाल्या कड़े टिकिट बुक केली होती. आज फक्त पैसे जावून द्यायचे होते. सकाळी नव्हे पहाटे आठ वाजता निघायचे होते. मागच्या अनूभवावरुन माहित होत की जेवढ़ लवकर जाता येईल तेवढ़ जास्त पहाता येइल. अर्थात जेवढ लवकर उठाव अस ठरवल जात तेवढ़ उशीर होतो हे त्रिवार सत्य आहे. आठच्या सुमारास घर सोडल. ' उपमा 'च नाश्ता बरोबर सोबत घेतला होता. घराबाहेर येताच बस मिळाली आणी आम्ही वाटेला लागलो अफजलगंजच्या. अफजलगंज बस स्टाप कुठला यावर एकमत न झाल्याने थोड पुढे उतरलो आणी पहाटेच्या नवूच्या रणरणत्या उनात मोर्निंग वाक झाला. तो सागर ट्रेवलवाला बंद होता, फोन केल्यावर त्याने बाजुच्या जुगनू नामक दुसर्याच ट्रेवल वाल्याकडे आमची रवानगी केली. त्याने पैसे घेवून एका विजिटिंग कार्डवर ४ माणसे असे लिहून दिले. केरळाला त्या कार्ड टिकिटकडे पाहून मला जसे वाटले होते तसेच मला आता वाटले. मी थोडा वेळ बूचकळ्यात पडलो. साडे नवु ला बस येते अस तो म्हणे, पण बस च कही पत्ता नव्हता. दहाला तो म्हणू लागला की बस आली. एका अळीच्या आकाराच्या बस मध्ये आम्ही शिरलो. त्या बस ने आम्हाला हैदराबाद दर्शन घडवल आणी आम्ही नामपल्लीला उतरलो, इथून एक मोठी बस निघणार होती. ही बस आधीच भरली असल्याने आम्हाला शेवटची सिट मिळाली. मी खाण्याचे पदार्थ घेवून आलो. बस सुटली पावणे अकराला. सकाळी झोप कमी झाल्याने की काय ?? मी मस्त ताणून दिल.
थोड्याच वेळात तो रामोजी चा बैनर दिसू लागला. बस शिरली त्या गेट मधून आत. टिकिट काढायच होत. बस चालवणारा सांगू लागला की आता म्हणे टिकिट काढून दुसऱ्या बाजूने यायच हीच बस आत घेवून जाणार. खाण्या पिण्याचे पदार्थ आत नेता येत नाहीत. आता आली पंचाइत.. आम्ही तर उपमा आणला होता. मी म्हटल की मी टिकिट काढून आणे पर्यंत तुम्ही खावुन घ्या उपमा. क्रेडिट कार्ड ने टिकिट काढल तिथे लाईन नव्हती. दोन घास उपमाचे खाल्ले असतील तर तो बस वाला घाई करू लागला नाईलाजस्तव आमच बोचक उपमा सकट त्या क्लोक रूम मध्ये ठेवाव लागल.
टिकिट चेक करून आम्ही दुसर्या बाजूने त्याच बस मध्ये चढलो. त्या बस ने आम्ही रामोजी फिल्म सिटी त पोहचलो. त्याने बस 'सिम्फोनी बस स्टैंड'ला उभी केली. पाई चालत आम्ही उरेका ला पोहचलो. उरेका हा प्रथम पड़ाव होता. इथून रामोजी सिटी टूर बस निघतात. लाईन लावून त्या लाल डब्यात चढलो.
रामोजी ची टूर निघाली. त्या प्लास्टर ऑफ पेरिस ची बनवलेल्या आभासी दुनियेत आमची बस फिरू लागली.मुंबई च्या गेट वे ऑफ़ इंडिया च्या आत आग्राचा ताजमहल आणी बाजूला अमृतसर च सुवर्ण मन्दिर. थोड पुढे हैदराबाद बंगलोर हाए वे, फक्त पाटी बदलायची की कुठलाही हाय वे बनतो तो. नंतर सिंगापूर, लन्दन, अमेरिचे सैर करून आम्ही परत भारतात आलो. फिरून तब्येत बिघडली म्हणुन एका होस्पितालत अडमिट झालो. फ्री इलाज करून एअरपोर्टला पोहचलो. इथे बस थांबली, आत जावून एअरपोर्ट फिरून चर्च मधून बाहेर आलो. एकाच बिल्डिंगला एका साइड ने हॉस्पिटल दुसऱ्या साइड ने चर्च तिसऱ्या बाजूने एअरपोर्ट आणी चौथी साइड लायब्ररी. बस ने आम्हाला मग कुपालू गुहे कड़े सोडल. त्या गुहेतून फिरून मग आम्ही पुन्हा बस मध्ये बसलो. ह्या बस ने आम्हाला हवा महलपाशी सोडल. कठपुतलीचा नाच पाहून आम्ही बस ने निघालो उरेका च्या दिशेने.
इथे अनेक प्रकारचे शो असतात. पहिला शो होता मोवी माजिक, हयात तिन शो होते, फ़िल्मी दुनिया, एक्शन थेटर , आणी रामोजी टॉवर. फ़िल्मी दुनिएत शिरताना रांग लावावी लागते. एका ९ सीटर बोटी सदृश्य वाहनातून फिरवतात, आत बाहुल्या होत्या आणी वेगवेगळे देखावे उभारलेले होते. ७ मिनिटात फिरून आल्यावर मग आम्ही गेलो एक्शन थेटर पहायला. इथे पण भली मोठी लाईन होती. १५ - २० मिनिटाच्या रांग प्रवासानंतर आम्ही आत शिरलो. आत एक मोठा टी व्ही होता. लोक रांगेत उभे राहून कंटाळलेले. बसु लागले तर तिथे उभ्या असणाऱ्याने सांगितल की बसु नका, मग परत सगळे उभे राहिले. टी व्ही वर रामोजीरावच भाषण आणी त्यानंर त्या उभ्या असणाऱ्या माणसाने एका मुलीची हिरोएन म्हणुन निवड केली आणी आम्ही सगळे आत गेलो. त्या मुलीला शोलेतल्या बसंती चे कपडे घालून स्टेज वर आणल. स्टेज वर एक बिन घोड्याचा टांगा होता. बाजूला दोन जण तो टांगा हलवत होते. तिला चाबुक देवून टांगा चालवण्याची एक्टिंग करायला सांगितल. ती बया हसत होती सारखी. नंतर त्या सिन मध्ये आवाज घातला गेला, बैक ग्रावुंड म्युसिक देवून शेवटी पूर्ण सिन दाखवला. मागे गुंड लागलेले आणी आमची ही हीरोइन मस्त हसत चाललेली पाहून सर्वे खुप हसले. तो माणूस म्हणे " देखो, शोले बनाना कितना कठिन है, इसलिए तो दोबारा न कभी शोले बनी ना कभी बनेगी ".
नंतर चा शो होता रामोजी टावर, पोटात कावळे ओरडत होते आणी आम्ही त्या टॉवर च्या रांगेत उभे होतो. अर्ध्या तासाने नंबर लागला. ती एक लिफ्ट होती, ३७ माळ्याची लिफ्ट समोर एक स्क्रीन. त्यावर आम्ही जणू वर चालले आहोत असा आभास. अचानक भूकंप झाला आणी लिफ्ट खाली पडू लागली. जितक्या वेगाने ती वर गेली होती तितक्याच वेगाने ती खाली आली. मस्त वाटल.
पोटातले कावळे शांत करण्यासाठी एका रेस्तोरंट मध्ये जावून सेल्फ सर्विस करून वेज कॉम्बो आणी चायनीज कॉम्बो रिचवला. पुढचा शो होता ' स्पिरिट ऑफ़ रामोजी' १५ मिनिटाच्या ह्या शो मध्ये नाच गाणी, जोकर चे माकडचाळे, वगेरे होत. त्या नंतर आणी शेवटचा चा शो होता स्टंट शो. साडे चार ला तो सुरु झाला. काऊ बॉय च्या धर्तीवर चा तो बोम्ब शो सर्वाना खुप आवडला. संद्याकाळचे ५ वाजत होते आणी त्या बस साठी साडे पाच ला त्या सिम्फोनीत जायच होत. फंडूस्तान फ़क्त उरल होत. अर्द्या तासात पटकन जावून येवू म्हणुन फंडूस्तान मध्ये त्या राक्षसाच्या तोंडातून आत शिरलो. टायटानिक पोज मध्ये फोटो काढला, माय फ्रेंड हनुमानासोब्त मोबाइल पाजळला. भोसुरात भयावह अनुभव घेतला. रेन डांस मध्ये अर्धवट भिजलो. तो बस वाला सारखा मोबाइल करू लागला, पहिल तर सहा वाजलेले. धावत पळत निघालो सिम्फोनी ला. त्याने पोहचल्यावर शिव्या घातल्या. एका कानने ऐकून दुसऱ्याने सोडून दिल्या. जी खुप मजा आली होती त्या पुढे त्या शिव्या काहीच नव्हत्या.
बस परतीच्या वाटेला लागली. शेवटच त्या रामोजीला डोळे भरून पाहून घेतल आणी त्याचा निरोप घेतला. बस पळू लागली हेदेराबादच्या दिशेने, वाटेत क्लोक रूम मधून आमच बोचक घेतल. आधी डबा उघडून बघीतला सुदैवाने उपमा ला काही झालेल नव्हत.
लवकरच हेदेराबाद आल आणी आम्ही '९४ यु' बस ने हेदेरगुडा गाठल. रागा होटेलात जेवून घरी पोहचलो.
रामोजी फिल्म सिटी माझी ही चौथी ट्रिप पण या वेळेस सुद्धा काहीतरी नविन पदरात पाडून घेतल्याच समाधान लाभल

रविवार, ५ जुलै, २००९

रन वे नाइन

ट्रिप टू रन वे नाइन....
अप्रैसल ची वेळ, दर वर्षी प्रमाणे मुरली सरांना हुक्की आली कुठेतरी बाहेर फिरायची. दीपक आणी राकेश यांचे आप्रैसल्स झाले होते. घरी जाण्याची वेळ आणी ते म्हणाले " बाहर जाने का प्लान करो, कही चलते है.",
" प्लान तो अच्छा है पर कहा जाये ", दीपक.
" श्रीशैलम कैसा रहेगा ", मी.
" वहा तो २ दिन लगेंगे ", मुरली सर.
" मुझे तो कपडे धोने है ", त्रिलोकी.
" पर छुट्टी तो एक ही दिन है ", राकेश.
" फिर कहा जाये, रामोजी फिल्म सिटी, नेहरू झू पार्क, हुसेन सागर, बहोत बार गये है." दीपक.
" एक दिन कपडे मत धोना, बाद में धोना, फॅमिली के साथ जाना तो श्रीशैलम अच्छा है ", मी माझा घोड़ दामटवल.
" फॅमिली ??? ". मुरली सर.
" अकेले कैसे जाये ", विवाहित लोकांची मेजोरिटी होती.
" तुम लोग रन वे नाइन कभी गये हो ", मुरली सर.
" सुना तो बहोत है पर कभी गये नहीं" सर्वानी सुर लावला.
" मेरे घरके पास ही तो है, इस बहाने घर भी आ जाओगे". मुरली.
तारीख २७, मार्च महिना, ठरल जायच रन वे नाइन ला. गाड़ी करावी लागणार होती. ड्रायव्हर शंकर ला मेस्सेज गेला. एक नव्हे दोन गाड्या बुक झाल्या. दुपारी निघयाच होत. त्यामुळे त्रिलोकी ला कपडे धुता येणार होते. मजा येणार होती आणी एक दिवसात आटपणार होत सगळ. फिरायला मिळणार म्हणुन सगळीकडे आनंदी आनंद होता. रन वे नाइन म्हणजे काय त्याची चौकशी नेट वरून करून झाली. कुठे आहे ते पासून त्याचे रेट काय इथपर्यंत इथंभूत बातमी काढली गेली. आणी आम्ही सज्ज झालो.
दुपारी २ ची वेळ, मोबाइल वाजला, त्रिलोकी चा मिस कॉल होता, अर्थ होता की आम्ही येत आहोत. मग राकेशला मिस कॉल गेला, आणी आम्ही दोघे खाली उतरलो सहकुटुंब. रस्त्याच्या दुसरया बाजूला गाड़ी उभी होती. सिट ला उचलून आम्ही मागे बसलो. गाड़ी निघाली रन वे नाइन च्या दिशेने. मेद्चल जिल्ह्यात नागपुर हाय वे वर एक अमुस्मेंट पार्क सारख एक ठिकाण आहे. इथे गो कार्टिंग, धनुष्य बाण, शूटिंग, रॉक क्लैम्बिंग, वगेरे खेळ आहेत, इनडोअर गेम्स पण आहेत. सर्वात आधी मुरली सरांच्या घरी जायच होत. दिपक आणी फॅमिली आधीच पोहचणार होते तिथे. तुषार आपल्या मैत्रिणीसोबत तिथेच येणार होता. मेहदीपटनम, लकडी का पुल, जुबिली हिल्स, सिकंदराबाद, करत गाडी मेद्च्ल ला लागली. हाय वे वरून पळू लागली. इथे वातावरण थोड रुक्ष होत. काटेरी झाड़ आणी झुडपे, उकाडा पण जाणवत होता. मुरली सरांच घर कुणाला माहित होत, पण मोबाइल ही इतकी मस्त गोष्ट आहे, त्याच्या सहारे आम्ही एक आलिशान सोसायटी समोर थांबलो. दोन बेडरूम ,होंल किचन बालकनी चा दुसरया माळ्यावरचा तो फ्लैट खरच खुप छान होता. दिपक,तुषार आधीच आले होते. दोन घोट पाणी पिवून आम्ही सगळे निघालो, मेन ठिकाणाकडे.
मुरली सरांच्या घरापासून जवळ असणार्या त्या रन वे नाइन च्या पाटीने आमच लक्ष्य वेधून घेतल. आमची गाड़ी त्या गेट समोर उभी राहिली. तिकिटे काढली गेली आणी एक कागदी पट्टा हातावर बांधण्यात आला. तो पट्टा हातावर वागवत आम्ही पहिल्या सफारी साठी सज्ज झालो. गो कार्टिंग म्हणे गेम च नाव, अंगावर तो घामट रेन कोट सदृश्य कोट चढ़वायचा डोक्यावर त्या वास वाल्या हेलमेटला बसवायच. एका मिनी गाडीतून सुसाट सुटायच. पैसे भरायचे माणशी २५० फक्त. ४ फेरया मारायच्या त्या नागमोडी रस्त्यावरून. रुजुता पहिली सुटली आणी सूटताच आपटली सरळ एका नागमोडी वळणावरच्या कड़ेला ठेवलेल्या टायरना. वेग जास्त नव्हता म्हणुन बर... मी मागुन सुटलो. अकसेलेटर वर पाय दाबुन अगदी सुसाट.. जणू गाडीला ब्रेक्क नाहीच. तीव्र वळणावर माझी मात्र ' सु ' टली. थोडक्यात वाचलो. इतक्या जवळून ते टायर पाहिले की काय सांगू.... २ फेरया झाल्या आणी तो लास्ट लेपचा बोर्ड दाखवायला लागला. मी खुणेने आणखी २ लेप उरलेत अस त्याला चालत्या गाडीवरून दाखवल. ३रि फेरी झाली आणी त्याने फिनिश ची पाटी दाखवली. मी तिकडे लक्ष्य न देता गाड़ी दामटवली. लास्ट लैप पूर्ण केला आणी अंगावरचा आधीच घामट असलेला कोट आणखिन घामट करून दिला.
' धनुष्यबाण कोण खेळणार ' अशी विचारणा झाली. सर्वांचे हात वर गेले. १५० रु माणशी.... हात परत खिश्यात.... " संदीप देगा पैसा " कोणीतरी म्हटल मग परत हात बाहेर आले...अर्थात संदीप ने टिकिट काढल तरी नंतर आम्हाला द्यावे लागणार होते पैसे. पावल वळली त्या लक्ष्य वेध च्या गोलाकार चित्राकडे. " पहिला मैं SSS " झुम्बड़ उडाली एकदम. मुरली सर बालाजी आणी त्रिलोकी गायब झाले कुठेतरी ??? कुणीतरी म्हटल की त्याना म्हणे तहान ( ?? ) लागली. " अरे ५ तो बज रहे है , इतनी जल्दी क्या है प्यास बुझाने की ", मी.
" एक बार में कितने बाण मिलते है " दिपक.
" आठ,", " और अगर बराबर लगे तो कुछ बक्शीश मीलता है क्या ", तिथे उभ्या असनार्याने ' हा काय कांटेस्ट आहे काय ' अश्या नजरेने पहिल. " अरे पहिले मारो तो सही ", दिपक ने मग धनुष्य बाण उचलला. अर्जुनाने जसा नेम लावला असेल त्या माश्या च्या डोळ्यावर तसा नेम लावला. दोरी ओढली आणी बाण सोडला. त्या बाणाने साष्टांग नमस्कार घातला आणी तो जमिनीवर नाक घासत गेला. " सुरवात में हम लोग हमेशा ऐसे ही नमस्कार करते है. " दिपक ने सावरल. दूसरा बाण पण पहिल्याच्या पावलावर पाउल ठेवून गेला. " अब वापस नमस्कार क्यों कर रहे हो ?" इति कुणीतरी. जरा जास्तच खाली जात होता म्हणुन दीपक ने इम्प्रोवायझेशन केल आणी बाण जरा वर नेम घरून मारला. आता मात्र तो त्या चित्रावर लागला. एकात एक असे ७,८ गोल होते वेगवेगळ्या रंगात. मधल्या लाल रंगावर मारल पाहिजे ना. दिपक चा नेम बरोबर ४थ्या गोलावर लागला. बाणाने त्या चित्राची एक पापी घेतली आणी तो जमिनीवर विसावला. ४थ्या बाणाने तीसुधा तसदी घेतली नाही त्याच या चित्राशी काय वैर होत देव जाणे. दिपक ने एका बाणाने चित्राशी स्पर्श केलेला पाहून धन्यता मानली. त्यानंतर तुषार, संदीप, आणी अंकित. अंकित ला तर बाण मारण्यापेक्षा फोटो काढून घेण्यात जास्त रस होता. फोटो च्या नादात त्याचा बाण सुटला आणी सर्व सीमारेषा ओलांडून तो पलिकडे एकदम जंगलात गायब झाला. " लेके आओ वो बान ", अंकित ने फर्मावल. " अब वो तो गुम गया है ", त्या पोरयाचा केविलवाना चेहरा पाहवेना. " अबे, ध्यान से मार बे, हमें भी तो खेलना है ". मी गुंडगिरी केली. बरेच बाण त्या चित्राला स्पर्श करून खाली पडत होते. राकेश ला ७ बाण मिळाले एक हरवला होता ना. बालाजी ताकदवान त्याचे ३ बाण चित्रात घुसले. एक तर २र्या पिवळ्या गोलात, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. माझी पाळी आली, ७ बाणावर का समाधान मानायाच. मी म्हटल मला ८ बाण पाहिजेत. एक बाण दोनदा मारतो. सर्वांनी अनुमोदन दिल आणी मी पूर्ण ताकदिनिशी बाण मारला. सर्वात बाहेरच्या गोलावर लागला. मग एका मागुन एक असे ४ बाण मी चित्रात घुसवले अन टाळ्या मिळवल्या. नवा रिकॉर्ड केला. एक बाण तर लाल गोलात लागला होता. माझ हे कौतुक इन मिन तिन लोकांकडून झाल कारण धनुषबाण झाल्यावर सगळे रायफल चालवायला गेले होते. मुलानंतर आता मुलींची पाळी होती. एकीचाही नेम लागला नाही. बरेच बाण जमिनीशी स्पर्धा करत गेले. उलट सर्वानी धनुष्य बाणाची प्रत्यंचा ओढून हात दुखवून घेतले.
आता रायफल चालवायची होती. १२ बार एकावेळेस मिळत होते. इथे इम्प्रोवायझेशनला काही वाव नव्हता. दिसतच नव्हत की गोळी कुठे लागली ते. समोर एक छोटा कागद लटकत होता आणी कळतच नव्हत की गोळी कागदावर लागली की कुठे लागली. त्या तिथे उभ्या असणार्या मख्ख चेहर्याच्या माणसाच्या चेहर्यावरची माशी हलली की समजाव की गोळी कागदावर लागली आहे म्हणुन. प्रत्येक बार ओढ़ल्यावर त्या माणसाकडे चौकशी करायची " लगा लगा क्या, " तो मान नकारार्थी हलवून सांगे, " साल्या, स्वताला काय जेम्स बोंड समजतोस काय ". माझा तर एक पण नेम लागला नाही. धनुष्य बाणाचा हा रोबिनहुड आधुनिक शस्त्रासमोर हतबल झाला होता. रुजुताने मात्र त्या कागदावर दोन भोके पाडली. खर म्हणजे त्या मख्ख चेहर्याच्या माणसाच्या चेहर्यावरची माशी अजिबात हलली नव्हती पण जेंव्हा तो कागद घेवून आला तेंव्हाच आम्हाला कळला तिचा पराक्रम. आता मी खुश होतो, पैसे वसूल झाले होते. मी धनुष्यबाणात तर हिने रायफल शूटिंग मध्ये प्राविण्य मिळवल होत. आता कुणी शत्रु आला तरी आम्ही दोघे मिळून त्याचा सामना करू शकत होतो. जुन्या शस्त्राने मी आणी नव्याने ती.
सूर्य मावळू लागला होता. आम्ही निघालो रेस्टोरंट कड़े. चहाची तलफ लागली होती. मुरली सर, बालाजी, त्रिलोकी यांचा अजुन पत्ता नव्हता. खुपच तहान लागली होती वाटत. आम्ही चहाने आमची तहान भागवली आणी इनडोर गेम्स कडे प्रस्थान केल. टेबल टेनिस, बिलियर्ड्स, एयर होकी, मूस बोंल वगेरे. दिपक ने तिकिटे काढली, माझ्या खिश्यातुन अजुन काहीही गेल नव्हत. मला इतर गेम मध्ये इन्तरेस्ट नव्हता. एक टेबल, दोन बाजूला दोन खेलाडू, एक चकती आणी दोन स्ट्राइकर. पलिकडच्या खेलाडू वर गोल करायचा, वेळ होती ३०० सेकेन्दाची. इथे मला खेळायाच होत. आधी वाटल की त्याच नाव मूस बोंल आहे. त्यामुळे त्याची दोन टिकिट काढली होती. नंतर कळल की त्याच नाव एयर होकी होत. मग टिकिट चेंज करून आणली. मी त्या गेमचा हात दुखेपर्यंत आस्वाद घेतला. मग थोड टेबल टेनिस, थोड बिलियर्ड्स वगेरे असच टाइमपाससाठी.
भूका लागल्या होत्या आणी रात्रीचे साडे आठ वाजत होते. मुरली सर आणी गैंग तहान भागवून गेम खेळायाला आले होते. आता निघायच ठरवून बाहेर आलो. गाडीतून निघालो एक चांगल्या होटेलाच्या शोधात. समोर हिरवागार गवती गालिचा त्यावर बऱ्याच फुलराण्या असलेला दीवाण ढाबा निवडला. गाडी पार्क करुन आत पोहचलो. एका मोठ्या टेबलावर पोहचलो आणी प्रस्थ माजवल. सर्वानी जोड़ी बनवली. फ़क्त मुरली सर बालाजी आणी त्रिलोकी ची त्रयी होती न शोभणारी...पनीर च्या भाज्या, रोट्या, आणी कर्ड राइस. त्या त्रयी च तहान भागवण अजुन चालू होत. जेवण येई पर्यंत आम्ही अन्ताक्षरी म्हणायच ठरवल. त्रिलोकी ने पहाड़ी भाषेत आणी आवाजात गाण म्हटल. अंकित ने फ़क्त कुठल्याश्या गाण्याच ध्रुवपद अर्धवट म्हटल. मग ठरल की कुठलही गाण म्हणायच. " सांग कधी कळणार तुला, भावः माझ्या मनातला ", माझ्या तोंडून शब्द फुटेना. मग मी लोकांना ऐकू जाव म्हणुन मोठ्याने म्हटल कसतरी, अर्थात दिपक - स्मिता सोडून कुणालाही काही कळल नाही आणी भसाडया आवजामुळे लोक गाण कधी संपेल अश्या रितीने पाहात बसले. त्रिलोकी त्यावेळेत पोट रिकाम करून आला. मुरली सरांनी सिगरेट विझवली. स्मिता ने मग त्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला. " वो ऐसा है की, मेरे मन का भावः तुमको कब कळेगा, मतलब समझेगा ". पण रुजुताच्या " पल पल दिल के पास, तुम रहते हो " ने मात्र टाळ्या मिळवल्या. जेवण आल होत आणी हाता तोंडाची मारामारी सुरु झाली होती.
आता आम्ही बाहेर आलो होतो, पान खायची इच्छा झाली आणी ११ पान तयार झाली. पोलिसांच्या वँनला पाहून त्या भैयाने टपरी बंद केली आणी मागच्या दाराने आम्हाला पान दिल. एकमेकांचा निरोप घेवून गाड्या निघाल्या घराच्या दिशेने.