तारीख २२ जून २००९
रामोजी फिल्म सिटी ... तसा मी बऱ्याच वेळा जावून आल्यामुळे आज पुन्हा तीथ जाण्यात नाविन्य नव्हत. आई , अमु ला पहायच असल्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी आज पुन्हा जायच ठरवल. रुजुताने काल इंटरनेट वरुन माहिती काढली होती आणी कुणा एका सागर नावाच्या ट्रेव्हल वाल्या कड़े टिकिट बुक केली होती. आज फक्त पैसे जावून द्यायचे होते. सकाळी नव्हे पहाटे आठ वाजता निघायचे होते. मागच्या अनूभवावरुन माहित होत की जेवढ़ लवकर जाता येईल तेवढ़ जास्त पहाता येइल. अर्थात जेवढ लवकर उठाव अस ठरवल जात तेवढ़ उशीर होतो हे त्रिवार सत्य आहे. आठच्या सुमारास घर सोडल. ' उपमा 'च नाश्ता बरोबर सोबत घेतला होता. घराबाहेर येताच बस मिळाली आणी आम्ही वाटेला लागलो अफजलगंजच्या. अफजलगंज बस स्टाप कुठला यावर एकमत न झाल्याने थोड पुढे उतरलो आणी पहाटेच्या नवूच्या रणरणत्या उनात मोर्निंग वाक झाला. तो सागर ट्रेवलवाला बंद होता, फोन केल्यावर त्याने बाजुच्या जुगनू नामक दुसर्याच ट्रेवल वाल्याकडे आमची रवानगी केली. त्याने पैसे घेवून एका विजिटिंग कार्डवर ४ माणसे असे लिहून दिले. केरळाला त्या कार्ड टिकिटकडे पाहून मला जसे वाटले होते तसेच मला आता वाटले. मी थोडा वेळ बूचकळ्यात पडलो. साडे नवु ला बस येते अस तो म्हणे, पण बस च कही पत्ता नव्हता. दहाला तो म्हणू लागला की बस आली. एका अळीच्या आकाराच्या बस मध्ये आम्ही शिरलो. त्या बस ने आम्हाला हैदराबाद दर्शन घडवल आणी आम्ही नामपल्लीला उतरलो, इथून एक मोठी बस निघणार होती. ही बस आधीच भरली असल्याने आम्हाला शेवटची सिट मिळाली. मी खाण्याचे पदार्थ घेवून आलो. बस सुटली पावणे अकराला. सकाळी झोप कमी झाल्याने की काय ?? मी मस्त ताणून दिल.
थोड्याच वेळात तो रामोजी चा बैनर दिसू लागला. बस शिरली त्या गेट मधून आत. टिकिट काढायच होत. बस चालवणारा सांगू लागला की आता म्हणे टिकिट काढून दुसऱ्या बाजूने यायच हीच बस आत घेवून जाणार. खाण्या पिण्याचे पदार्थ आत नेता येत नाहीत. आता आली पंचाइत.. आम्ही तर उपमा आणला होता. मी म्हटल की मी टिकिट काढून आणे पर्यंत तुम्ही खावुन घ्या उपमा. क्रेडिट कार्ड ने टिकिट काढल तिथे लाईन नव्हती. दोन घास उपमाचे खाल्ले असतील तर तो बस वाला घाई करू लागला नाईलाजस्तव आमच बोचक उपमा सकट त्या क्लोक रूम मध्ये ठेवाव लागल.
टिकिट चेक करून आम्ही दुसर्या बाजूने त्याच बस मध्ये चढलो. त्या बस ने आम्ही रामोजी फिल्म सिटी त पोहचलो. त्याने बस 'सिम्फोनी बस स्टैंड'ला उभी केली. पाई चालत आम्ही उरेका ला पोहचलो. उरेका हा प्रथम पड़ाव होता. इथून रामोजी सिटी टूर बस निघतात. लाईन लावून त्या लाल डब्यात चढलो.
रामोजी ची टूर निघाली. त्या प्लास्टर ऑफ पेरिस ची बनवलेल्या आभासी दुनियेत आमची बस फिरू लागली.मुंबई च्या गेट वे ऑफ़ इंडिया च्या आत आग्राचा ताजमहल आणी बाजूला अमृतसर च सुवर्ण मन्दिर. थोड पुढे हैदराबाद बंगलोर हाए वे, फक्त पाटी बदलायची की कुठलाही हाय वे बनतो तो. नंतर सिंगापूर, लन्दन, अमेरिचे सैर करून आम्ही परत भारतात आलो. फिरून तब्येत बिघडली म्हणुन एका होस्पितालत अडमिट झालो. फ्री इलाज करून एअरपोर्टला पोहचलो. इथे बस थांबली, आत जावून एअरपोर्ट फिरून चर्च मधून बाहेर आलो. एकाच बिल्डिंगला एका साइड ने हॉस्पिटल दुसऱ्या साइड ने चर्च तिसऱ्या बाजूने एअरपोर्ट आणी चौथी साइड लायब्ररी. बस ने आम्हाला मग कुपालू गुहे कड़े सोडल. त्या गुहेतून फिरून मग आम्ही पुन्हा बस मध्ये बसलो. ह्या बस ने आम्हाला हवा महलपाशी सोडल. कठपुतलीचा नाच पाहून आम्ही बस ने निघालो उरेका च्या दिशेने.
इथे अनेक प्रकारचे शो असतात. पहिला शो होता मोवी माजिक, हयात तिन शो होते, फ़िल्मी दुनिया, एक्शन थेटर , आणी रामोजी टॉवर. फ़िल्मी दुनिएत शिरताना रांग लावावी लागते. एका ९ सीटर बोटी सदृश्य वाहनातून फिरवतात, आत बाहुल्या होत्या आणी वेगवेगळे देखावे उभारलेले होते. ७ मिनिटात फिरून आल्यावर मग आम्ही गेलो एक्शन थेटर पहायला. इथे पण भली मोठी लाईन होती. १५ - २० मिनिटाच्या रांग प्रवासानंतर आम्ही आत शिरलो. आत एक मोठा टी व्ही होता. लोक रांगेत उभे राहून कंटाळलेले. बसु लागले तर तिथे उभ्या असणाऱ्याने सांगितल की बसु नका, मग परत सगळे उभे राहिले. टी व्ही वर रामोजीरावच भाषण आणी त्यानंर त्या उभ्या असणाऱ्या माणसाने एका मुलीची हिरोएन म्हणुन निवड केली आणी आम्ही सगळे आत गेलो. त्या मुलीला शोलेतल्या बसंती चे कपडे घालून स्टेज वर आणल. स्टेज वर एक बिन घोड्याचा टांगा होता. बाजूला दोन जण तो टांगा हलवत होते. तिला चाबुक देवून टांगा चालवण्याची एक्टिंग करायला सांगितल. ती बया हसत होती सारखी. नंतर त्या सिन मध्ये आवाज घातला गेला, बैक ग्रावुंड म्युसिक देवून शेवटी पूर्ण सिन दाखवला. मागे गुंड लागलेले आणी आमची ही हीरोइन मस्त हसत चाललेली पाहून सर्वे खुप हसले. तो माणूस म्हणे " देखो, शोले बनाना कितना कठिन है, इसलिए तो दोबारा न कभी शोले बनी ना कभी बनेगी ".
नंतर चा शो होता रामोजी टावर, पोटात कावळे ओरडत होते आणी आम्ही त्या टॉवर च्या रांगेत उभे होतो. अर्ध्या तासाने नंबर लागला. ती एक लिफ्ट होती, ३७ माळ्याची लिफ्ट समोर एक स्क्रीन. त्यावर आम्ही जणू वर चालले आहोत असा आभास. अचानक भूकंप झाला आणी लिफ्ट खाली पडू लागली. जितक्या वेगाने ती वर गेली होती तितक्याच वेगाने ती खाली आली. मस्त वाटल.
पोटातले कावळे शांत करण्यासाठी एका रेस्तोरंट मध्ये जावून सेल्फ सर्विस करून वेज कॉम्बो आणी चायनीज कॉम्बो रिचवला. पुढचा शो होता ' स्पिरिट ऑफ़ रामोजी' १५ मिनिटाच्या ह्या शो मध्ये नाच गाणी, जोकर चे माकडचाळे, वगेरे होत. त्या नंतर आणी शेवटचा चा शो होता स्टंट शो. साडे चार ला तो सुरु झाला. काऊ बॉय च्या धर्तीवर चा तो बोम्ब शो सर्वाना खुप आवडला. संद्याकाळचे ५ वाजत होते आणी त्या बस साठी साडे पाच ला त्या सिम्फोनीत जायच होत. फंडूस्तान फ़क्त उरल होत. अर्द्या तासात पटकन जावून येवू म्हणुन फंडूस्तान मध्ये त्या राक्षसाच्या तोंडातून आत शिरलो. टायटानिक पोज मध्ये फोटो काढला, माय फ्रेंड हनुमानासोब्त मोबाइल पाजळला. भोसुरात भयावह अनुभव घेतला. रेन डांस मध्ये अर्धवट भिजलो. तो बस वाला सारखा मोबाइल करू लागला, पहिल तर सहा वाजलेले. धावत पळत निघालो सिम्फोनी ला. त्याने पोहचल्यावर शिव्या घातल्या. एका कानने ऐकून दुसऱ्याने सोडून दिल्या. जी खुप मजा आली होती त्या पुढे त्या शिव्या काहीच नव्हत्या.
बस परतीच्या वाटेला लागली. शेवटच त्या रामोजीला डोळे भरून पाहून घेतल आणी त्याचा निरोप घेतला. बस पळू लागली हेदेराबादच्या दिशेने, वाटेत क्लोक रूम मधून आमच बोचक घेतल. आधी डबा उघडून बघीतला सुदैवाने उपमा ला काही झालेल नव्हत.
लवकरच हेदेराबाद आल आणी आम्ही '९४ यु' बस ने हेदेरगुडा गाठल. रागा होटेलात जेवून घरी पोहचलो.
रामोजी फिल्म सिटी माझी ही चौथी ट्रिप पण या वेळेस सुद्धा काहीतरी नविन पदरात पाडून घेतल्याच समाधान लाभल
सोमवार, ६ जुलै, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा